Join us  

बटन दाबलं की गरमागरम इडली हातात... आहे की नाही जादू, बघा इडलीचं एटीएम, व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 1:02 PM

Viral Video of Idli ATM: बघा कशी आहे ही मस्त आयडिया.. बटन दाबलं की गरमागरम इडली- चटणी तुमच्या पुढे अवघ्या काही सेकंदात हजर..

ठळक मुद्देअवघ्या एका मिनिटाच्या आता तुम्ही ऑर्डर केलेला पदार्थ त्या मशिनमधून बाहेर येतो. शिवाय आतमध्ये नेमकी काय प्रोसेस सुरू आहे, हे देखील तुम्ही मशिनच्या स्क्रिनवर पाहू शकता.

एटीएम ने कसं आपलं काम अगदी सोपं करून ठेवलं आहे. ना बँकेत जा, ना गर्दीत उभे रहा, ना कोणते चलान भरा... फक्त एटीएमवर जा, कार्ड वापरा आणि हवे तेवढे पैसे तुमच्या खात्यातून काढून घ्या. अगदी सहज अवघ्या काही सेकंदात तुम्ही मशिनवर टाकलेली रक्कम तुमच्या पुढ्यात तयार असते. तसंच एक भन्नाट एटीएम निघालं आहे. त्याचं नाव आहे इडली एटीएम (Idli ATM). बटन दाबताच हव्या तेवढ्या इडल्या तुम्हाला मिळू शकतात.

 

सध्या सोशल मिडियावर हा इडली एटीएमचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. @padhucfp या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

स्ट्राँग ममा! मेकअप करता करता बाळाला ब्रेस्टफीड करणाऱ्या सोनम कपूरच्या व्हायरल फोटोची गोष्ट..

हे इडलीचं एटीएम बँग्लोर येथील एका मॉलमध्ये बसवण्यात आलं असून याद्वारे तुम्हाला अगदी २४ तास गरमागरम इडली उपलब्ध होऊ शकते. बरं इडलीच नाही, तर मेदू वडा, वडा-सांबार, इडली- सांबार असे वेगवेगळे पदार्थही या मशिनद्वारे मिळू शकतात. साधारणपणे बँकेचे एटीएम जसे दिसायला असते, तसेच हे मशिन आहे. फक्त त्याचा आकार एटीएमच्या तुलनेत आणखी मोठा आहे. 

 

हे मशिन कसं ऑपरेट करायचं?ऑपरेट करायला हे मशिन अत्यंत सोपे आहे. सगळ्यात आधी तर तिने दिलेला कोड मोबाईलने स्कॅन करायचा. त्यानंतर त्या मशिनमधून तुम्हाला कोणकोणते पदार्थ मिळू शकतात, याचं मेन्यूकार्ड तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसतं.

करवा चौथ स्पेशल : बॉलिवूड अभिनेत्रींच्या सुंदर साड्या, लालचुटूक-भरजरी साड्यांचे पहा एकसेएक व्हायरल फोटो

त्यानंतर तुम्हाला हवा तो पदार्थ निवडायचा, किती पाहिजे आहे ते सांगायचं आणि ऑनलाईन पेमेंट करायचं. अवघ्या एका मिनिटाच्या आता तुम्ही ऑर्डर केलेला पदार्थ त्या मशिनमधून बाहेर येतो. शिवाय आतमध्ये नेमकी काय प्रोसेस सुरू आहे, हे देखील तुम्ही मशिनच्या स्क्रिनवर पाहू शकता. आहे की नाही, रेडिमेड पदार्थ हातात आणून देणारं भन्नाट मशिन?

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नएटीएम