Join us  

दिपिकाच्या वादग्रस्त ‘बेशरम रंग’गाण्यावर जपानी तरुणीचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 5:44 PM

Viral Video Of Japanise Girl Dance On Besharam Rang Song : अगदी जशाच्या तशा स्टेप्स करत दाखवले बॉलिवूडवरील प्रेम

ठळक मुद्देकाही जणांनी तिला या गाण्याबाबत झालेल्या वादाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  ती दिपिकाप्रमाणेच इतक्या परफेक्ट स्टेप्स करते की तिला गाण्याचे बोल कळत नाहीत असं वाटतच नाही.

बॉलिवूडचा एखादा चित्रपट प्रसिद्ध झाला की त्यातील गाणी भरपूर गाजतात. पुढचे काही दिवस सगळीकडे त्याच गाण्यांची चर्चा असते. शाहरुख खान आणि दिपिका पदुकोण यांच्या नुकत्याच येऊ घातलेल्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं तर गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहे. विविध कारणांमुळे चर्चेत असलेलं हे गाणं केवळ भारतातच नाही तर परदेशातही गाजत आहे. जपानमधील लोकांना बॉलिवूडच्या गाण्याची बऱ्याचदा भुरळ पडत असल्याचे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो. बऱ्याचदा जपानी तरुणी भारतीय गाण्यांवर थिरकताना दिसतात (Viral Video Of Japanese Girl Dance On Besharam Rang Song). 

नुकताच अशाच एका जपानी तरुणीचा बेशरम रंग गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती दिपिकाप्रमाणेच इतक्या परफेक्ट स्टेप्स करते की तिला गाण्याचे बोल कळत नाहीत असं वाटतच नाही. इन्स्टाग्रामवर मेयो जपान नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या वरच्या बाजूला दिपिकाचा ओरीजनल व्हिडिओही दाखवण्यात आल्याने ही तरुणी किती परफेक्ट स्टेप्स करते हे दिसून येते. लाल रंगाचा ड्रेस आणि काळई लेगिन्स घालून ही तरुणी अतिशय छान डान्स करत आहे. तिच्या मागे पाण्याचे एक छान तळे असून ओपन जागीच ती हा छान डान्स करताना दिसते. 

व्हिडिओमध्ये एक तरुणही दिसतो जो गाण्यातील शाहरुख खानप्रमाणे अॅक्टींग करताना दिसतो. दिपिका पदुकोणप्रमाणे सेक्सी डान्स करण्याचा मी प्रयत्न केला पण मी तिला मॅच करु शकत नाही. तसेच तिने काकेताकू याचे शाहरुख खानचा रोल केल्याबद्दल आणि व्हिडिओचे शुटींग आणि एडीटींग केल्याबद्दल आभारही मानले आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अवघ्या ३ दिवसांत हजारो जणांनी पाहिला असून १६ हजार जणांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत जपानी तरुणीच्या डान्सचे कौतुक केले आहे तर काही जणांनी तिला या गाण्याबाबत झालेल्या वादाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य