या लोकांना सध्या झालंय तरी काय.. कुणी आईस्क्रिममध्ये मॅगी टाकतो, तर कुणी गुलाबजामचे पराठे बनवतो. खाद्य पदार्थ करताना त्यात इतके भयानक प्रयोग केले जात आहेत की खाणारे आणि सोशल मिडियाद्वारे ते बघणारे दोघेही जाम वैतागले आहेत. आज उठून कोण काय करेल, कोणत्या पदार्थासोबत काय टाकेल, काहीही सांगता येत नाही.. म्हणूनच तर नेटकरी आता जाम भडकले असून यांना कुणीतरी थांबवा रे.. असं म्हणत मनातली चडफड व्यक्त करत आहेत.. (jilebi samosa recipe)
जिलेबी आणि समोसा हे दोन्ही पदार्थ म्हणजे लाखो लोकांची जान. खमंग, चटकदार समोसा खाल्ल्यानंतर कुणालाही गोड, मधाळ, कुरकुरीत जिलेबीचा आस्वाद घ्यावासा वाटला, तर ते समजण्यासारखे आहे. पण या महाशयांनी तर कमालच केली आहे. त्यांनी चक्क समोसा आणि जिलेबी हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खवय्यांचा चांगलाच रोष ओढवून घेतला आहे.
इन्स्टाग्रामच्या radiokarohan या पेजवर हा भन्नाट व्हिडिओ शेअर (instagram share) करण्यात आला आहे. जिलेबी समोसा नावाची ही रेसिपी. ही रेसिपी करताना त्या शेफने पीठाचा समोसासारखा आकार केला. साधारणपणे समोसा करताना त्यात बटाट्याचं सारण भरलं जातं. या महाशयांनी मात्र त्यात जिलेबीचे तुकडे भरले आहेत. जिलेबीचे तुकडे भरून त्याने तो समोसा तळला आणि नंतर एका प्लेटमध्ये टाकून सर्व्ह केला. समोसा सर्व्ह करण्याआधी त्याने त्या प्लेटमध्ये साखरेचा पाक टाकला.. असा हा अतरंगी पदार्थ खाऊन बघायलाही चांगलीच डेअरिंग लागत असणार हे नक्की..