आरशात पाहणे ही आपल्यासाठी अगदीच सामान्य गोष्ट आहे. साणावाराच्या दिवसांत तर आपण कितीतरी वेळ आरशासमोरच असतो. आवरुन झाले तरी आरशासमोर रेंगाळायला अनेकांना आवडते. मग तो आरसा कपाटाचा असो किंवा अगदी लिफ्टमधला. आपण त्यामध्ये स्वत:ची छबी पाहण्याची एकही संधी सोडत नाही. आता हे झाले आपल्याबद्दल पण लहान मुलांना आरसा काय असतो हे माहित नसते, त्यामुळे आपली छबी ते जेव्हा पहिल्यांदा आरशात पाहतात तेव्हा हे बाळ कोण आहे असं वाटून ते आपल्याच प्रतिमेला हात लावण्याचा, त्याची पापी घेतात, तर कधी चक्क मारण्याचाही प्रयत्न करतात. ही गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेली असते. लहान मुलं ज्याप्रमाणे आरशात पाहिल्यावर करतात त्याच पद्धतीने काही वेळा प्राणीही स्वत:ला आरशात पाहून करतात (Viral Video of Leopard After Seeing Himself in a Mirror ).
नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक बिबट्या स्वत:ला बघून काही गमतीशीर हरकती करताना दिसत आहे. जंगली प्राण्यांनी स्वत:ला आरशात बघायची वेळ फारशी येत नसावी. पण हा बिबट्या ज्याठिकाणी होता तिथे एक मोठाच्या मोठा आरसा लावलेला दिसत आहे. हा बिबट्या आरशाच्या समोरुन शांतपणे चालत जाताना दिसतो. आरसा संपतो त्यावेळी त्याचे लक्ष बाजूच्या आरशाकडे जाते आणि तो वळून त्यामध्ये पाहतो. तेव्हा साहजिकच आरशात त्याला स्वत:ची छबी दिसते. पण आरसा म्हणजे काय याबाबतची कल्पना कदाचित त्याला नसल्यामुळे त्यामध्ये दिसणारी त्याचीच छबी ही छबी नसून तो एक वेगळा प्राणी आहे असे त्याला वाटते.
Leopard reacts to seeing himself in a mirror pic.twitter.com/Zpsz6dzRMM
— OddIy Terrifying (@OTerrifying) October 22, 2022
त्यानंतर हा बिबट्या अतिशय निरागसपणे या आरशावर उड्या मारतो आणि त्या समोरच्या प्राण्याशी झटापट करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर कदाचित समोर दुसरा प्राणी नसल्याचे त्याच्या लक्षात येत असावे मग तो आरशाच्या मागे वाकूनही पाहतो. मात्र प्रत्यक्षात इतर कोणीच नसल्याने त्याला लक्षात येते. मात्र त्याचा निरागसपणा आणि तो करत असलेली झटापट पाहून आपल्याला काहीसे हसू आल्याशिवाय राहत नाही. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून ८ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अवघ्या १५ सेकंदांचा हा व्हिडिओ काही दिवसांत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोक तो पाहण्याची मजा घेत आहेत.