Join us  

मेरा दिल ये पुकारे...चिमुकलीचा क्यूट डान्स पाहून लोक म्हणाले, हा तर पाकिस्तानी तरुणीपेक्षा भारी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2022 12:20 PM

Viral Video of Little Girl on Mera Dil ye Pukare Song : तिचे हावभाव आणि गोंडसपणा पाहून आपल्यालाही तिचे कौतुक वाटल्यावाचून राहणार नाही.

ठळक मुद्देजवळपास ३ लाखाच्या आसपास लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.सोशल मीडियाचा अॅक्सेस इतक्या लहान वयात कसा काय असा प्रश्नही नेटीझन्सनी यावेळी उपस्थित केला आहे

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतं. तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असाल तर तुम्ही पाकीस्तानी तरुणी आयेशा हिचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मेरा दिल ये पुकारे या गाण्यावरचा डान्स नक्कीच पाहिला असेल. तिच्या या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल तर झालाच पण त्यावर बरीच चर्चाही रंगली. या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आले असून त्यावर अनेकांनी डान्स करत त्याचे व्हिडिओ पोस्ट केले. त्यानंतर आता एका चिमुकलीचा याच गाण्यावरच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तिचे हावभाव आणि गोंडसपणा पाहून आपल्यालाही तिचे कौतुक वाटल्यावाचून राहणार नाही (Viral Video of Little Girl on Mera Dil ye Pukare Song). 

ही चिमुकली बेडरुममध्ये आरशात बघून अतिशय क्यूट अशा स्टेप्स करत आहे. विशेष म्हणजे ती फक्त डान्सच्या स्टेप्सच करत नाही तर आपल्या बोबड्या बोलात या गाण्याचे बोलही म्हणत आहे. या चिमुकलीचे नाव मनिहा असून ती अगदी मन लावून या गाण्यावर डान्स आणि अॅक्शन करताना दिसते. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ आपलोड करण्यात आला आहे. या गाण्याचा अर्थ तिला कळतो की नाही माहित पण तिचा निरागसपणा आणि गोंडसपणाचे नेटीझन्सकडून कौतुक होत आहे. 

अवघ्या १२ दिवसांत हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर लाखो लोकांनी पाहिला असून जवळपास ३ लाखाच्या आसपास लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. ‘मनिहाचे मेरा दिल ये पुकारा गाण्याचे व्हर्जन’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. तिच्या डान्सचे आणि क्यूट हावभावांचे कौतुक होत असले तरी लहान मुलांवर अशाप्रकारचे संस्कार होत असल्यावरुन नेटीझन्सनी काही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियाचा अॅक्सेस इतक्या लहान वयात कसा काय आणि लहान मुलांनी असं काही करणं अपेक्षित नाहीये असं म्हणत बऱ्याच जणांनी पालकांनी याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे असेही आपल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे.   

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य