Join us  

चिमुरडीनं अनोख्या स्टाइलनं गायलं भजन; निरागस भक्तीनं नेटिझन्सही गेले हरखून, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:20 AM

Viral video of little girl singing bhajan : लहान मुलं मोठ्याचं अनुकरण करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. इतक्या लहान वयातही ती गाणं गात होती आणि बाकीची मंडळी तिच्या मागे  गात होती

लहान मुलं कधी कधी त्यांच्या वागण्याबोलण्यानं अनेकांना मंत्रमुग्ध करतात.  त्यांच्या मनात  कोणाबद्दलही द्वेष, मत्स नसतो.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलगी भजन गात आहे. हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे.  शाळेचा गणवेश घातलेली एक लहान मुलगी इतर अनेक महिलांसोबत भजन गाताना पाहू शकता.   (Viral video of little girl singing bhajan wins internet her innocent devotion will melt your heart)

लहान मुलं मोठ्याचं अनुकरण करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. इतक्या लहान वयातही ती गाणं  गात होती आणि बाकीची मंडळी तिच्या मागे  गात होती.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा दिवस आनंदात जात आहे. या व्हिडिओमध्ये चिमुकली भजन म्हणत असताना तिचा आवाज लोकांना खूप आवडतो. इतर महिलाही यात सहभाग घेतात. इतक्या लहान वयात चिमुकली गाणं गातेय हे पाहून नेटिझन्स चकीत होतात.  

'कमेंट्स विभागात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.  या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले असून, या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत २४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून १ हजाराहून अधिक लाईक्स याव्हिडिओला मिळाले आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया