Lokmat Sakhi >Social Viral > चिमुरडीची शिकवण्याची क्यूट स्टाइल आणि जोश तर पाहा; इतकीशी असून शिकवायची हौस भारी...व्हायरल व्हिडिओ

चिमुरडीची शिकवण्याची क्यूट स्टाइल आणि जोश तर पाहा; इतकीशी असून शिकवायची हौस भारी...व्हायरल व्हिडिओ

Viral Video of Little Girl Teaching in a Classroom : बोबड्या सूरात तिचे हे आकडे ऐकायला छान वाटतात आणि तिच्या उत्साहाचेही आपल्याला कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2022 04:09 PM2022-12-11T16:09:37+5:302022-12-12T16:53:39+5:30

Viral Video of Little Girl Teaching in a Classroom : बोबड्या सूरात तिचे हे आकडे ऐकायला छान वाटतात आणि तिच्या उत्साहाचेही आपल्याला कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

Viral Video of Little Girl Teaching in a Classroom : Look at the girl's teaching style and enthusiasm; There is so much desire to teach...viral video | चिमुरडीची शिकवण्याची क्यूट स्टाइल आणि जोश तर पाहा; इतकीशी असून शिकवायची हौस भारी...व्हायरल व्हिडिओ

चिमुरडीची शिकवण्याची क्यूट स्टाइल आणि जोश तर पाहा; इतकीशी असून शिकवायची हौस भारी...व्हायरल व्हिडिओ

Highlightsएका आठवड्यात हा व्हिडिओ २० हजार जणांनी पाहिला असून असंख्य जणांनी तो लाईक केला इतक्याशा वयात या चिमुकलीचा जोश तर पाहा

शाळेत किंवा क्लासमध्ये प्रत्येक शिक्षकांची मुलांना शिकवण्याची स्टाईल वेगवेगळी असते. काही शिक्षक अतिशय प्रेमाने मुलांना समजेपर्यंत शांतपणे समजावून सांगतात. तर काही शिक्षक फक्त फळ्यावर लिहून त्याआधारे समजावून सांगतात. काही शिक्षक पुस्तक अजिबात हातात न घेता शिकवतात. तर काही मुलांशी अगदी सहज गप्पा मारत, हसत-खेळत त्यांना एखादा विषय शिकवून जातात तेही कळत नाही. आता शिक्षकांनी शिकवमे ठिक आहे. पण काही वेळा शिक्षक वर्गात नसताना वर्गातील काही मुले पुढे येतात आणि गमतीत शिक्षकांची नक्कल करतात. घरातही मुलं अनेकदा शाळा-शाळा खेळताना आपल्या बाहुल्यांना समोर बसवून शिक्षकांप्रमाणे शिकवतात (Viral Video of Little Girl Teaching in a Classroom). 

आता हे सगळे ठिक आहे, पण सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक अगदीच लहान मुलगी आपल्या वर्गात पुढे उभे राहून मुलांना आकडे म्हणायला शिकवत आहे. तिच्यामागे मुलेही आकडे म्हणत असताना व्हिडिओमध्ये ऐकू येते. अवघ्या ३ ते ४ वर्षाच्या या मुलीचा आवाज तर खणखणीत आहेच पण ती अतिशय जोशात मुलांकडून हे आकडे म्हणून घेत आहे. बोबड्या सूरात तिचे हे आकडे ऐकायला छान वाटतात आणि तिच्या उत्साहाचेही आपल्याला कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. शाळेचा गणवेश आणि टाय घातलेली ही लहानगी पूर्ण जीव तोडून ओरडून आकडे म्हणत आहे. 

ट्विटरवर गुलजार साहब या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर कऱण्यात आला असून हा व्हिडिओ अवघ्या २९ सेकंदांचा आहे. एका आठवड्यात हा व्हिडिओ २० हजार जणांनी पाहिला असून असंख्य जणांनी तो लाईक आणि रिट्विटही केला आहे. बऱ्याच जणांनी या व्हिडिओला हार्टच्या इमोजी प्रतिक्रियांमध्ये देत आपली पसंती दर्शवली आहे. तर व्हिडिओला कॅप्शन देताना छोट्या मुलीचा जोश तर पाहा असे म्हटले आहे. 
 

Web Title: Viral Video of Little Girl Teaching in a Classroom : Look at the girl's teaching style and enthusiasm; There is so much desire to teach...viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.