Join us  

कमाल! ९ मुलांना एका सायकलवर शाळेत सोडणाऱ्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल, पाहून नेटीझन्स म्हणाले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 12:37 PM

Viral Video of Man Carrying 9 Kids On Cycle at a Time : एक वडील आपल्या ९ मुलांना एकावेळी सायकलवरुन शाळेला सोडवत असल्याचे दिसते.

ठळक मुद्दे१ लाखांहून अधिक जणांनी हा १८ सेकंदांचा व्हिडिओ पाहिला आहे. ३ मुलं तर सायकल चालवणाऱ्याच्या अंगावर उभी राहिलेली आणि २ मुलं सायकलच्या पुढच्या चाकाच्या कव्हरवर बसलेली दिसतात.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना आपण सगळेच रोज सामोरे जात असतो. शहरांच्या ठिकाणी होणारी ट्रॅफिक, सगळीकडे प्रचंड गर्दी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या इतर समस्या ही विकसनशील देशांमधील परिस्थिती आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यातून पुन्हा एकदा हे प्रश्न समोर येतात. तर सायकलवरुन मुलांना शाळेत सोडणारे वडील हे चित्र आजही खेड्यात अगदी सामान्य आहे. आता सायकल म्हटल्यावर १ किंवा फारतर २ मुले त्यावर असतील तर ठिक आहे. पण एक वडील आपल्या ९ मुलांना एकावेळी सायकलवरुन शाळेला सोडवत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ पाहून सुरुवातीला आपल्याला हसायला येते. मात्र त्या वडीलांवर काय परिस्थिती आल्याने त्यांना असे करावे लागत असेल असा प्रश्न दुसऱ्याच क्षणी आपल्या डोक्यात येतो (Viral Video of Man Carrying 9 Kids On Cycle at a Time). 

एक व्यक्ती सायकल चालवत असून त्याच्या पुढे आणि मागे अगदी अंगावरही ९ मुलं बसल्याचे दिसते. काही मुलं कॅरीयरवर, तर काही सायकलच्या पुढच्या दांडीवर बसलेली आहेत. ३ मुलं तर सायकल चालवणाऱ्याच्या अंगावर उभी राहिलेली आणि २ मुलं सायकलच्या पुढच्या चाकाच्या कव्हरवर बसलेली दिसतात. या मुलांना आणि या व्यक्तीलाही अशाप्रकारे सायकलवर नियमितपणे जाण्याची सवय असावी असे व्हिडिओ पाहून वाटते. यातील काही जण शाळेच्या वेशात असून काही जण रंगबिरंगी कपड्यांमध्ये आहेत. तर या मुलांच्या बॅग्सही सायकलच्या हँडलला लटकवलेल्या दिसतात. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तो आफ्रिकेच्या कोणत्या गावातील असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

 

तर या व्हिडिओला कॅप्शन देतानाही जगाची लोकसंख्या आता ८ अरब झाली असून अशा लोकांचे ही लोकसंख्या वाढवण्यात मोठे योगदान आहे असे म्हटले आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून एका दिवसांत तो वेगाने व्हायरल झाला आहे. १ लाखांहून अधिक जणांनी हा १८ सेकंदांचा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून काहींनी तो रिट्विटही केला आहे. 'सगळी त्यांचीच मुले असतील असे काही नाही.', 'यावरुन त्यांची गरिबी दिसून येते.'  अशा प्रतिक्रिया नेटीझन्सनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया