Lokmat Sakhi >Social Viral > माकडाच्या पिल्लांची स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत मस्ती, व्हिडिओ पाहून वाटेल गंमत

माकडाच्या पिल्लांची स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत मस्ती, व्हिडिओ पाहून वाटेल गंमत

Viral Video Of Monkey’s Enjoying in Swimming Pool : ते करत असलेली मस्ती आणि मज्जा पाहून ती माकडं नसून लहान मुलंच आहेत असा भास आपल्याला काही क्षण होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 12:38 PM2022-11-10T12:38:11+5:302022-11-10T12:41:13+5:30

Viral Video Of Monkey’s Enjoying in Swimming Pool : ते करत असलेली मस्ती आणि मज्जा पाहून ती माकडं नसून लहान मुलंच आहेत असा भास आपल्याला काही क्षण होतो.

Viral Video Of Monkey’s Enjoying in Swimming Pool : Fun video of baby monkey jumping in swimming pool | माकडाच्या पिल्लांची स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत मस्ती, व्हिडिओ पाहून वाटेल गंमत

माकडाच्या पिल्लांची स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत मस्ती, व्हिडिओ पाहून वाटेल गंमत

Highlightsआतापर्यंत १५ लाखहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून जवळपास ५ हजारहून अधिक जणांनी तो रिट्विट केला आहे. रांगेत थांबून एकानंतर एक जण उडी मारतो त्याचप्रमाणे तेही अतिशय शिस्तीत हा खेळ करताना दिसतात.

स्विमिंग पूल म्हणजे लहान मुलांसाठी अतिशय आवडीची गोष्ट. पाण्यात खेळणे, उड्या मारणे आणि मस्ती करणे लहानग्यांना भलतेच आवडते. त्यामुळे पाणी दिसलं की मुलं त्यावर नुसती तुटून पडतात. कधी ट्रीपला एखाद्या रिसॉर्टवर गेल्यावर किंवा समुद्रकिनारी गेल्यावर मुलांना कधी एकदा पाण्यात खेळायला मिळते असे होऊन जाते. आता लहान मुलांचे ठिक आहे. पण आपले पूर्वज असलेल्या माकडाच्या पिलांचेही असेच होते असे सांगितले तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहून माकडांना किंवा त्यांच्या पिलांनाही पाण्यात उड्या घेण्यात किती आनंद मिळतो हे आपल्याला दिसू शकेल (Viral Video Of Monkey’s Enjoying in Swimming Pool). 

ट्विटरवर एक १३ सेकंदांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक लहानसा स्विमिंग पूल असून त्याबाजूला असलेल्या छपरावर माकडाची बरीच पिल्लं बसलेली दिसतात. ही पिल्लं या लहानशा स्विमिंग पूलमध्ये उड्या घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आपण ज्याप्रमाणे रांगेत थांबून एकानंतर एक जण उडी मारतो त्याचप्रमाणे तेही अतिशय शिस्तीत हा खेळ करताना दिसतात. उडी मारल्यानंतर ते स्विमिंग पूलच्या कडेला येऊन पूलच्या बाहेरही येतात. ‘माकडं मस्ती करत आहेत’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली असून हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही छान वाटल्याशिवाय राहत नाही. ते करत असलेली मस्ती आणि मज्जा पाहून ती माकडं नसून लहान मुलंच आहेत असा भास आपल्याला काही क्षण होतो. 


हा व्हिडिओ नेमका कोणत्या देशातला किंवा शहरातला आहे हे समजू शकलेले नाही. मात्र सोशल मीडियावर तो बराच व्हायरल झाला आहे. नेटीझन्सही अतिशय आवडीने तो पाहून रिट्विट करत आहेत. आतापर्यंत १५ लाखहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून जवळपास ५ हजारहून अधिक जणांनी तो रिट्विट केला आहे. ४२ हजारांहून अधिक जणांनी व्हिडिओला लाईक केले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे प्राणीही माणसांप्रमाणे मज्जा-मस्ती करतात हेच आपल्याला यातून दिसते. माकडांचे माणसासारखा गॉगल लावलेले, खाताना किंवा आणखी काही करतानाचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये या व्हिडिओने आणखी एक भर पडली आहे. 
 

Web Title: Viral Video Of Monkey’s Enjoying in Swimming Pool : Fun video of baby monkey jumping in swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.