काल ८ मे ला जगभरात मातृ दिन साजरा केला गेला. यादिवशी आईवरचं प्रेम दर्शवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रत्येकानं आपल्या आईच्या गोड आठवणींसह फोटो शेअर केले आणि आईचे आभार मानले तर काहींनी दणक्यात सेलिब्रेशनही केले. मदर्स डे च्या दिवशी स्टेट्स ठेवणाऱ्या मुलांनी म्हातारपणी आईचा व्यवस्थित सांभाळ केला म्हणजे झालं. अशा आशयाचे मीम्सही तुफान व्हायरल झाले. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओनं नेटिझन्सचा काळजाचा ठोका चुकवला आहे. (Super mom this mother takes care of her daughter without hands watch the heartbreaking video)
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी मदर्स डेच्या निमित्ताने हा व्हिडिओ ट्विटरवर पुन्हा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही हात नसतानाही ही आई आपल्या बाळाचा सांभाळ करत आहे त्याला कपडे घालण्यास मदत करत आहे. दिव्यांग आईसुद्धा आपल्या बाळाचा छान सांभाळ करू शकते हे दर्शवणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये बेल्जियमची कलाकार सारा तालबी आहे. जी हातांशिवाय जन्माला आली होती.
सारा आपल्या रोजच्या आयुष्यातील अपडेट्स म्हणजेच जेवणं बनवणं, बाळाचा सांभाळ करणं, घरातली कामं याचे व्हिडिओ आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. चाहत्यांचाही साराच्या पोस्टवर भरभरून प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतो. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना, 'आईपेक्षा मोठा योद्धा कोणीच नाही, हे अगदी बरोबर आहे.
लग्नात अचानक नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड पोहोचली; नवरीला पाहताच अशी रिॲक्शन दिली, पाहा व्हिडिओ
#MothersDay निमित्त, सर्व मातांचे मनःपूर्वक अभिनंदन ज्यांनी आपल्या मुलांना प्रेम, प्रेरणा आणि मूल्यांचे सिंचन करून सक्षम केले.' असे कॅप्शन दिलं आहे. आतापर्यंत ९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडिओला मिळाले असून १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी ट्विटरवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.