देसी गर्ल प्रियांका चोप्रा भलेही परदेशात वास्तव्यास असो किंवा तिने परदेशी नवरा केलेला असो.. तरीही ती तिची भारतीय पाळंमुळं अजिबात विसरलेली नाही. त्यामुळेच तर ती कधी तिचे खास टिपिकल भारतीय असे स्वयंपाक घरातले ब्यूटी सिक्रेट्स सांगते तर कधी मुलगी आणि नवऱ्याला सोबत घेऊन भारतीय सण- उत्सव साजरे करते. तिच्या मुलीलाही भारतीय संस्कार, परंपरांनुसार वाढविण्याचा तिचा प्रयत्न असतो. म्हणूनच तर कोणत्याही सर्वसामान्य भारतीय कुटूंबातील बाळांच्या हातात दिसतात तसे काळे मणी प्रियांकाने तिच्या मुलीच्या म्हणजेच मालतीच्या हातातही बांधले हेाते. आता मालतीच्या व्हायरल झालेल्या फोटोंंमधून पुन्हा एकदा प्रियांकाच्या 'देसी'पणाची झलक दिसते आहे. (viral video of Priyanka Chopra's Daughter Malati is Making roti with her grand mother)
प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एक फोटो अतिशय मस्त आहे. त्या फोटोमध्ये प्रियांकाची मुलगी मालती चक्क पोळ्या लाटताना दिसते आहे. आपल्याकडे मुलगी थोडी मोठी झाली की ती आईच्या कामात गोड लुटबूड करू लागते.
जान्हवी कपूर सांगते- फक्त आईच्या 'त्या' इच्छेसाठी मी कितीही मोठी ऑफर धुडकावू शकते...
आई जे काम करत असेल तेच काम तिलाही करायचं असतं. पोळपाट, लाटणं आणि त्यावरचा कणकेचा गोळा याचं तर लहान मुलांना नेहमीच विशेष आकर्षण वाटतं. त्यामुळे मग ते त्याचा हट्ट करतातच. अशावेळी आपण मुलांना पोळपाट- लाटणं आणि कणकेचा एक लहानसा गोळा देतो. तसंच काहीसं प्रियांकाच्या आईने म्हणजेच मधू चोप्रा यांनी केलं आणि मालतीने त्याच्या पोळ्या लाटल्या..
मालतीचा हा फोटो सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होतो आहे. मालतीने केलेल्या पोळ्यांसोबत प्रियांका तिच्या आईच्या हातची भेंडीची भाजी खाणार आहे.
रोजच्या पोळ्या होतील खूप पौष्टिक! भिजवताना कणकेत घाला ५ पदार्थ - साधी पोळीही लागेल चवदार
आईच्या हातची भेंडीची भाजी आणि रोटी हा प्रियांकाचा आवडीचा मेन्यू असावा, असं त्या व्हिडिओतून दिसून येतं. भारतीय लोक कुठेही गेले, कितीही वेगवेगळे परदेशी पदार्थ खाल्ले तरी त्यांना खरा आनंद आईच्या हातचे पारंपरिक पदार्थ खाऊनच मिळतो, हेच यावरून दिसून येतं.