Join us

भला मोठा स्कर्ट घालून गरागरा मारल्या कोलांट्या उड्या, छोट्याशा मुलीचा भन्नाट व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2023 15:31 IST

Viral Video of Somersault By Girl: स्कर्ट (long skirt) घालून गरागर कोलांटी उड्या (somersault) मारणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिला का तिचा व्हिडिओ....

ठळक मुद्देस्कर्टचा घेर सावरता सावरता चालणं एखादीला अवघड वाटेल... अशा स्कर्टमध्ये त्या मुलीने एका मागे एक अशा सलग दणादण कोलांटी उड्या मारल्या.

सध्या रिल्सचा जमाना आहे. त्यामुळे इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरचे खूप रिल्स बघायला मिळतात. काही रिल्स बघून खरोखरच अचंबित व्हायला होतं. तर काही भलतेच मजेशीर असतात. आता सध्या व्हायरल झालेला एक व्हिडिओही त्यापैकीच एक आहे. यामध्ये एक मुलगी ज्या पद्धतीने भराभर कोलांटी उड्या (somersault) मारते आहे, ते पाहून तिच्या फिटनेसचं, शरीराच्या लवचिकतेचं आणि तिच्या कौशल्याचं खरोखरंच कौतूक वाटतं. कारण हल्लीच्या लहान मुलांना सहजतेने एकही कोलांटी उडी मारता येत नाही. (Viral video of somersault by girl wearing very long skirt)

 

एकतर कोलांटी उडी मारणंच अवघड असतं आणि त्यात ही मुलगी भला मोठा घेरदार स्कर्ट घालून अगदी वेगात कोलांटी उड्या मारते आहे. इंस्टाग्रामच्या somyagymnast या पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये जी मुलगी दिसते ती साधारण १४- १५ वर्षांची असावी, असं वाटतं.

अंकिता लोखंडेने आईला राखी बांधली तर काय बिघडलं? लोकांनी का केलं तिला ट्रोल?

त्या मुलीने जो हिरव्या रंगाचा स्कर्ट घातला आहे, तो जरा जास्तच घेरदार आहे. स्कर्टचा घेर सावरता सावरता चालणं एखादीला अवघड वाटेल, एवढा तो घेरदार स्कर्ट आहे. आणि अशा स्कर्टमध्ये त्या मुलीने एका मागे एक अशा सलग दणादण कोलांटी उड्या मारल्या. अवघ्या काही दिवसांतच या व्हिडिओला जवळपास ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्राम