Lokmat Sakhi >Social Viral > डोक्यावर तयार केली चहाची किटली!! 'Tea Pot' हेअरस्टाईलचा बघा भन्नाट व्हायरल व्हिडिओ 

डोक्यावर तयार केली चहाची किटली!! 'Tea Pot' हेअरस्टाईलचा बघा भन्नाट व्हायरल व्हिडिओ 

Viral Video Of Tea Pot Hair Style: सध्या सोशल मिडियावर ही tea pot हेअरस्टाईल कमालीची व्हायरल झाली आहे.. बघा हा मस्त मजेशीर व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 04:19 PM2024-07-05T16:19:01+5:302024-07-05T16:28:36+5:30

Viral Video Of Tea Pot Hair Style: सध्या सोशल मिडियावर ही tea pot हेअरस्टाईल कमालीची व्हायरल झाली आहे.. बघा हा मस्त मजेशीर व्हिडिओ...

Viral video of tea pot hair style by Irani hair stylist | डोक्यावर तयार केली चहाची किटली!! 'Tea Pot' हेअरस्टाईलचा बघा भन्नाट व्हायरल व्हिडिओ 

डोक्यावर तयार केली चहाची किटली!! 'Tea Pot' हेअरस्टाईलचा बघा भन्नाट व्हायरल व्हिडिओ 

Highlightsत्या हेअरस्टायलिस्टच्या कल्पकतेची खरोखरच कमाल असून तिने चक्क चहाच्या किटलीची हेअरस्टाईल केली आहे. एवढंच नाही तर त्या किटलीतून चक्क चहादेखील पडतो...

इन्स्टाग्रामवर शेअर होणारे रिल्स सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. तुम्ही जर त्या माध्यमातून काही शेअर केलं आणि ते लोकांना आवडलं तर तुमचे रिल्स अक्षरश: जगाच्या कानाकोपऱ्यातही पाहिले जाऊ शकतात. आता हेच बघा ना इराणमधल्या एका हेअर स्टायलिस्टचा व्हिडिओ सध्या साेशल मिडियावर खूप गाजतो आहे. आजवर तुम्ही कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल पाहिल्या असतील. पण अशा पद्धतीची ही मजेशीर हेअरस्टाईल क्वचितच तुमच्या पाहण्यात आली असेल. त्या हेअरस्टायलिस्टच्या कल्पकतेची खरोखरच कमाल असून तिने चक्क चहाच्या किटलीची हेअरस्टाईल केली आहे. एवढंच नाही तर त्या किटलीतून चक्क चहादेखील पडतो... (Viral video of tea pot hair style by Irani hair stylist)

 

डोक्यावर केली चहाच्या किटलीची हेअरस्टाईल

saeidehariaei_hairstylist या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. २ दिवस सलग मेहनत घेऊन ही हेअरस्टाईल पुर्ण झाली असल्याचं हेअर स्टायलिस्टने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

रणबीर कपूर म्हणाला लहानपणी 'हा' होता करिना- रिधीमाचा आवडीचा खेळ, आणि त्यात मी नेहमीच.... 

यात असं दिसत आहे की सुरुवातीला हेअर स्टायलिस्टने मॉडेलच्या केसांचा एक उंच पोनीटेल बांधला आणि त्यानंतर माथ्यावर तारा लावून तयार केलेला एक गोलाकार ठेवला. ग्लू गन, मॉडेलच्या केसांप्रमाणे रंग असणारे कृत्रिम केस आणि इतर अनेक गोष्टी वापरून ही हेअरस्टाईल करण्यात आली आणि तिला हुबेहूब किटलीचा आकार देण्यात आला. आणि सगळ्यात विशेष म्हणजे केसांना नुसता किटलीचा आकार देऊन ती हेअरस्टायलिस्ट थांबली नाही. तर तिने त्या किटलीमध्ये खरेखुरे पाणीही टाकले.

 

मॉडेलने डोके खाली झुकवले की त्या किटलीतले पाणी कपामध्ये पडत होते.

मुलांचं टीव्ही- मोबाईल बघणं कमी करण्याचा १ खास उपाय, स्वत:हून स्क्रीन टाइम कमी करतील...

पण जेव्हा कपामध्ये आणखी पाणी टाकण्यासाठी हेअर स्टायलिस्टने मॉडेलचे डोके जेव्हा आणखी खाली झुकवले तेव्हा मात्र त्या हेअरस्टाईलमधून पाण्याचे थेंब गळू लागले. हेअर स्टाईल करताना त्या हेअरस्टायलिस्टने जी काही कल्पनाशक्ती वापरली आहे, तिचं अतिशय कौतुक होत असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर अतिशय व्हायरल झाला आहे. 


 

Web Title: Viral video of tea pot hair style by Irani hair stylist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.