Join us  

असा ट्रॅफिक पोलिस तुम्ही कधीच पाहिला नसेल, गाड्या मॅनेज करताना करतो असे काही...पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 12:10 PM

Viral Video of Traffic Policeman Who is Dancing While Directing Vehicles : एका ट्रॅफिक पोलिसाने याच कामात आपला आनंद शोधून ते काम खूप खास केले आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओला कॅप्शन देताना ‘त्याचे आपल्या कामावर प्रेम आहे’ असे म्हटले आहे. अवघ्या ४५ सेकंदांच्या या व्हिडिओला २ दिवसांत १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ट्रॅफिक पोलिस म्हणजे आपण सिग्नल मोडल्यावर आपल्याला अडवणारे किंवा कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून आपले लायसन्स, पीयुसी तपासणारे इतकेच आपल्याला माहित आहे. पण काही लोक त्यांचे काम इतके आवडीने आणि आनंद घेत करत असतात की ते पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आता ट्रॅफिक पोलिसांचे काम म्हटले तर खूप थकवणारे आणि रटाळ आहे असे आपल्याला वाटेल. पण एका ट्रॅफिक पोलिसाने याच कामात आपला आनंद शोधून ते काम खूप खास केले आहे (Viral Video of Traffic Policeman Who is Dancing While Directing Vehicles). 

या ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्या कामाचे आणि ते करण्याच्या पद्धतीचे बरेट कौतुक होत आहे. तर सिग्नलवर गाड्यांना योग्य दिशा देण्याचे काम करणारा हा ट्रॅफि पोलिस नुसते उभे राहून किंवा शिट्ट्या वाजवून आपले काम करत नसून तो ट्रॅफिक कंट्रोल करताना चक्क डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. त्याच्या हातात लाईटची एक काठी असून तिचा वापर करुन तो अतिशय छान सिग्नल देत आहे. हे करताना तो इतके हातवारे आणि हालचाली करतो की त्यामुळे तो किती थकत असेल याचा अंदाज आपल्याला येतो. 

हा व्हिडिओ भारतातील नसून परदेशातील असल्याचा अंदाज आहे, मात्र तो नेमका कुठला आहे हे समजू शकले नाही. अवघ्या ४५ सेकंदांच्या या व्हिडिओला २ दिवसांत १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोक या पोलिसाचे बरेच कौतुक करत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक करत त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. तर या व्हिडिओला कॅप्शन देताना ‘त्याचे आपल्या कामावर प्रेम आहे’ असे म्हटले आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापोलिस