Join us  

पारदर्शक गुलाबजाम पाहिलाय कधी? बघा, गुलाबजामचा रंग का उडाला, कुणी उडवला? भन्नाट व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 2:45 PM

Viral Video of Transparent Gulabjam: गुलाबजाम प्रेमी असाल तर तुमच्या आवडीच्या या पदार्थचं असं आगळं वेगळं रुप एकदा बघूनच घ्या...

ठळक मुद्देबेंगलोरयेथील एका फुडस्टॉलवर हा पदार्थ मिळतो, असं समजतं. व्हिडिओ शेअर करताच तो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे

गुलाबजाम हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. गरमागरम गुलाबजाम जसे अनेकांना आवडतात तसेच थंडगार गुलाबजामही आवडतात. आता लालसर, चॉकलेटी रंगाचे गुलाबजाम आपण नेहमी बघतो आणि खातो. काही वेळा जरासा मोठ्या आकाराचा काला जामूनही आवडीनं खाल्ला जातो. आता इथपर्यंत ठीक होतं. पण सध्या गुलाबजामचा एक खूपच वेगळा प्रकार सोशल मिडियावर प्रचंड गाजतो आहे. यात दाखवण्यात आलेला गुलाबजाम लालसर चॉकलेटी रंगाचाही नाही आणि काळाही नाही. तो गुलाबजाम चक्क बर्फासारखा पारदर्शक दिसतो आहे (Transparent gulabjam). हा नेमकं काय प्रकरण आहे, ते खाली लिंक केलेल्या व्हिडिओमध्ये एकदा बघाच.(Viral video of transparent gulabjam,)

 

tastethisbangalore या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच तो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे आणि त्यावर अनेक उलट सुलट चर्चाही सुरू आहेत.

बटाटेवड्यांचं कव्हर कधी जाड- कधी मऊसर होतं? बघा डाळीचं पीठ भिजवण्याची सोपी युक्ती

बेंगलोरयेथील एका फुडस्टॉलवर हा पदार्थ मिळतो, असं समजतं. व्हिडिओमध्ये असं दिसतं की एक ताटली आहे. त्यात गुलाबजामचे तुकडे टाकलेले असावेत, असं भासणारा एक पदार्थ आहे. आणि त्या ताटलीमध्ये एक पारदर्शक गोळा किंवा वॉटर बॉल किंवा बर्फाचा तुकडा दिसावा, असा पदार्थ गोल- गोल फिरतो आहे. त्याच्यावर मधोमध एक काळा ठिपका आहे.

 

आता पारदर्शक गुलाबजाम म्हणून हा पदार्थ व्हायरल होत आहे. पण अनेक जणांना तो गुलाबजाम असावा, असं मुळीच वाटत नाही.

Happy married life सासूबाई!, असं म्हणत सासूच्या लग्नात खंबीरपणे पाठीशी उभं राहणाऱ्या सुनेची- मिताली मयेकरची गोष्ट

बहुतांश लोकांच्या मते तो फक्त एक बर्फाचा गोळा आहे. आता ताे खरंच बर्फ आहे की गुलाबजाम आहे की दुसराच कोणता गोड पदार्थ आहे, हे त्याची चव घेतल्यानंतरच कळेल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नपाककृती