Lokmat Sakhi >Social Viral > लग्नाचं फोटोशूट करताना नवरीला बाजूला करत माकडाने नवरदेवालाच मारली मिठी, खट्याळ व्हिडिओ व्हायरल

लग्नाचं फोटोशूट करताना नवरीला बाजूला करत माकडाने नवरदेवालाच मारली मिठी, खट्याळ व्हिडिओ व्हायरल

Viral Video of Wedding Couple Photo shoot Was Crashed by Monkey : माकडाच्या अशा अचानक येण्याने हे कपल काहीसे आश्चर्यचकीत होते आणि हसताना दिसते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 12:17 PM2022-12-26T12:17:53+5:302022-12-26T13:51:33+5:30

Viral Video of Wedding Couple Photo shoot Was Crashed by Monkey : माकडाच्या अशा अचानक येण्याने हे कपल काहीसे आश्चर्यचकीत होते आणि हसताना दिसते.

Viral Video of Wedding Couple Photo shoot Was Crashed by Monkey : See, during a wedding photoshoot, a monkey hugs the bridegroom by pushing the bride aside, the video goes viral | लग्नाचं फोटोशूट करताना नवरीला बाजूला करत माकडाने नवरदेवालाच मारली मिठी, खट्याळ व्हिडिओ व्हायरल

लग्नाचं फोटोशूट करताना नवरीला बाजूला करत माकडाने नवरदेवालाच मारली मिठी, खट्याळ व्हिडिओ व्हायरल

Highlightsपाहा लग्नाचं फोटोशूट करताना कपलला डिस्टर्ब करायला कसं आलं माकडमाकडाचा असा अनोखा अंदाज याआधी आपण कधीच पाहिला नसेल

लग्न म्हटल्यावर त्याचं फोटोशूट हे ओघानेच आलं. नवीन आयुष्याची सुरुवात करताना आपल्या जोडीदारासोबतचे क्षण कॅमेरात कैद करण्याला आजकाल खूप महत्त्व आहे. कॅमेरामन आणि व्हिडिओग्राफर आपली कला वापरत नवदाम्पत्याचे फोटो काढत असतात. यामध्ये वेगवेगळ्या पोझ घ्यायला लावले जाते आणि छान फोटोशूट होते. पण हे फोटोशूट करताना काही वेळा अशा गमती घडतात की हे शूट आपल्या चांगलेच लक्षात राहते. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फोटोशूट करताना चक्क एक माकड आणि त्याचे पिल्लू कपलच्या मधे येते (Viral Video of Wedding Couple Photo shoot Was Crashed by Monkey).

त्याचे होते असे एक कपल आपल्या लग्नाचे फोटोशूट ओपन स्पेसमध्ये करत असतात. एका छानशा पूलावर फोटोची पोझ देण्यासाठी नवरा नवरीला कडेवर उचलतो. त्यावेळी अचानक त्याठिकाणी एक माकड येते. नवरी घाबरुन बाजूला होते तोच हे माकड या नवऱ्याच्या कडेवर चढते आणि चक्क त्याला मिठी मारते. इतकेच नाही तर या माकडाच्या पोटाशी त्याचे छोटेसे पिल्लूही आपल्याला दिसते. माकडाच्या अशाप्रकारच्या अचानक येण्याने हे कपल काहीसे आश्चर्यचकीत होते आणि हसताना दिसते. मग हे नवरा-बायको दोघेही प्रेमाने माकडाच्या अंगावरुन हात फिरवतात. त्यानंतर काही वेळाने ते माकड जाते आणि मग या कपलचे पुन्हा फोटोशूट सुरू होते. 

 

 

इन्स्टाग्रामवर She said Yes या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अवघ्या ४ दिवसांत या व्हिडिओला ३ लाख ५३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून असंख्य जणांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी यावर काही ना काही विनोद करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण अशाप्रकारे कपलच्या मध्ये येणाऱ्या माकडामुळे सोशल मीडियावर या कपलची खिल्ली उडवली जात आहे. या नवरीने छानसा व्हाईट गाऊन घातला असून नवरदेवाने ब्लेझर घातल्याचे दिसते. 

Web Title: Viral Video of Wedding Couple Photo shoot Was Crashed by Monkey : See, during a wedding photoshoot, a monkey hugs the bridegroom by pushing the bride aside, the video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.