Join us  

जर्मनीत घरोघरी बायका ‘अशा’धुतात भाज्या, पाहा नवीन पद्धत-भाजीतलं पोषण उडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 9:40 AM

Viral Video on Social Media of washing Vegetables in Germany : प्रत्येक देशात भाज्या करण्याची पद्धत ज्याप्रमाणे वेगळी असते त्याचप्रमाणे ती धुण्याचीही पद्धत वेगळी असते.

भाज्या बाजारातून आणणे, त्या वेगळ्या करुन निवडून ठेवणे आणि मग प्रत्यक्ष करायच्या वेळी त्या स्वच्छ धुणे, चिरणे अशी बरीच कामे असतात. भाज्यांवर असणारी माती, किटकनाशके, इतर घाण निघून जाण्यासाठी त्या धुणे अतिशय महत्त्वाचे असते. नाहीतर ही घाण पोटात जाऊन आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता असते. म्हणूनच भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात असे वारंवार सांगितले जाते. कोरोना काळात तर आपण भाज्या धुण्याच्या असंख्य पद्धती असतात. त्याप्रमाणे भाज्या नीट धुतल्यास त्या योग्य पद्धतीने स्वच्छ होतात आणि खाण्यासाठी चांगल्या ठरतात (Viral Video on Social Media of washing Vegetables in Germany). 

त्यामुळेच भाज्या आधी काही वेळ पाण्यात धुवून ठेवाव्यात, मग त्या हाताने चोळून धुवाव्यात आणि मग स्वच्छ पुसून चिराव्यात असे सांगितले जाते. मात्र अनेकदा घाईघाईत आपण त्या कशातरी धुतो आणि चिरतो. त्यामुळे त्यावरची किटकनाशके पूर्णपणे धुतली जातातच असं नाही. मात्र भाज्या पाण्यात भिजवून ठेवण्याची स्टेप अतिशय महत्त्वाची असते. ती करायलाच हवी. प्रत्येक देशात भाज्या करण्याची पद्धत ज्याप्रमाणे वेगळी असते त्याचप्रमाणे ती धुण्याचीही पद्धत वेगळी असते. जर्मनीमध्ये जर्मन लोक भाज्या कशा धुतात पाहूया...

भारतात भाज्या धुण्याची पद्धत

आपण साधारणपणे एका मोठ्या बाऊलमध्ये भाजी घेतो आणि त्यात पाणी घालून धुतो. पालेभाज्या असतील तर चाळणीत आपण त्या धुतो जेणेकरुन माती खाली निघून जाईल. तर कमी भाजी असेल तर आपण थेट हातात भाजी घेतो आणि हाताने चोळून डायरेक्ट धुतो. आता नव्या पद्धतीमध्ये सिंकला वॉशिंग बास्केट लावण्याची आणि त्यात भाज्या धुण्याचीही पद्धत आहे. पण बहुतांश वेळा आपण भांडे, चाळणी किंवा हाताचाच भाजी धुण्यासाठी वापर करतो. 

जर्मनीत भाज्या धुण्याची पद्धत...

जर्मनीमध्ये लोक थेट सिंकमध्ये भाज्या आणि फळे धुतात. यासाठी मध्यभागी असलेली जाळी बंद करतात आणि सिंकमध्ये पूर्ण पाणी घेऊन त्यात भाज्या घालून भिजवून ठेवतात. आता आपल्याला वाटेल सिंकमध्ये भाज्या कशा धुणार यात तर आपण काहीवेळा चहाचे कप, पाणी पिण्याचे ग्लास, चमचे किंवा काही वेळा खरकटी भांडीही ठेवतो. त्यामुळे हे सिंक खरकटे किंवा मेंचट झालेले असते, त्यामध्ये अशाप्रकारे पाणी साठवून भाज्या किंवा फळे धुणे शक्यच नसते. पण कदाचित परदेशातील लोकांचे सिंक इतके खराब होत नसावे त्यामुळे ते त्याठिकाणी भाज्या धुवत असतील. इन्स्टाग्रामवर श्वेता कदम या मराठी युट्यूबरचे धन्य ते फॉरेन नावाने अकाऊंट असून त्यावर त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले असून त्यावर बऱ्याच जणांनी काही ना काही कमेंटसही केल्या आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाभाज्या