Join us  

Viral Video : बिकिनी घातलेल्या सारा खाननं स्पॉट गर्लला मुद्दाम पाण्यात ढकललं? व्हिडिओ पाहून नेटिझन्स भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 6:01 PM

Viral Video : या व्हिडिओमध्ये सारा अली खान पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. सारा तिच्या स्पॉट गर्लसोबत स्विमिंग पूलच्या बाजूला उभी राहून कॅमेऱ्यासमोर पोज देत असते.

ठळक मुद्देकोणीही अशी पाण्यात ढकलण्याची मस्ती का करेल?

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) खूप खोडकर, चंचल आहे याची कल्पना तिच्या चाहत्यांना आहेच. कॅमेऱ्यासमोर ती गंभीर असली तरी पण खऱ्या आयुष्यात मात्र ती खूप मस्तीच्या मूडमध्ये असते. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओत सारा स्पॉट गर्लसह मस्ती करताना दिसली त्यामुळेच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.  (Sara ali khan pushed spot girl into swimming pool people trolled her brutally)

सारा अली खान मोठ्या पडद्यावरील तिच्या अभिनयामुळे तसेच सोशल मीडियावर तिच्या मस्तीखोर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी सारा अली खानचा एक प्रँक व्हिडिओ चर्चेत आहे. ज्यामध्ये तिने तिच्या स्पॉट गर्लसोबत असे काही केले आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. साराने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला, जो काही वेळातच व्हायरल झाला. 

या व्हिडिओमध्ये सारा अली खान पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. सारा तिच्या स्पॉट गर्लसोबत स्विमिंग पूलच्या बाजूला उभी राहून कॅमेऱ्यासमोर पोज देत असते. मात्र, तेव्हा साराच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. असे कदाचित कोणालाच वाटले असेल. यानंतर साराने जे केले ते समोरच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

१८ वर्षीय लेडी डॉन थेरगाव क्विन आहे तरी कोण? शिवीगाळ करणारे व्हिडिओ का बनवले? वाचा

सारा अली खानने तिला पूलमध्ये जोरात ढकलले आणि नंतर तिनं स्वतः उडी मारली. सारानं याला प्रँक म्हटले असले तरी सोशल मीडिया यूजर्स याला प्रँक मानत नाहीत. युजर्स तिच्यावर भडकले असून कोणीही अशी पाण्यात ढकलण्याची मस्ती का करेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

किसचे १० प्रकार आणि त्याचे अर्थ माहिती आहेत का? वाचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या सुंदर भावनांची गोष्ट

दरम्यान सारा अली खान  'अतरंगी रे' चित्रपट नुकताच गाजला. सारा अली खानचा आगामी चित्रपट विकी कौशलसोबत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात सारा अली खान सौम्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्तानं सारा आणि विकीची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानसोशल व्हायरलसोशल मीडिया