Join us  

Viral Video : तिने पाळलेला कुत्राही करतो तिच्यासोबत आसनं; जगभरचे नेटिझन्सन झाले चकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 4:41 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही...आता हेच पाहा ना, पाळलेला कुत्रा आपल्या मालकीणीसोबत योगा करतो...अगदी तिच्याप्राणेच करतो सगळी आसनं...

ठळक मुद्देअवघ्या १५ दिवसांत पाहिला १४ लाख जणांनी व्हिडिओ...कुत्र्याचे आणि त्याच्या मालकीणीचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे...

पाळीव प्राणी म्हणजे कुटुंबियांसाठी त्यांच्या मुलाप्रमाणे असतात. आपल्या मुलाप्रमाणेच पाळलेल्या कुत्र्याचे किंवा मांजराचे लाड कऱणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात. घरातील लहान मुले जसे मोठ्यांचे पाहून एखादी कृती करतात किंवा ऐकून त्यांच्याप्रमाणे बोलायचा प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे प्राणीही आपल्या मालकाला कॉपी करताना दिसतात. सोशल मीडियावर नुकताच एका कुत्र्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये हा कुत्रा आपल्या मालकीणीप्रमाणे योगा करताना दिसत आहे. आता या कुत्र्याला योगा करायला कोणी शिकवले असा साहजिक प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. तर त्याच्या मालकीणीने त्याला हे स्कील शिकवले आणि काही दिवसांनी चक्क तोही तिच्यासोबत योगा करु लागला (Dog dose yoga with owner) . 

(Image : Google)

सोशल मीडियावर कधी प्राण्यांचे तर कधी लहान मुलांचे काही ना काही हरकती करतानाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीही मिळते. त्याचप्रमाणे या व्हिडिओचेही झाले आहे. अगदी कमी वेळात व्हायरल झालेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर १४ लाख जणांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर दिड लाखांहून अधिक जणांनी त्याला लाईक केले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या कुत्र्याचे नाव मॅग्नस असून इन्स्टाग्रामवर ज्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे त्या पेजचे नावही मॅग्नस द थेरपी डॉग असे ठेवण्यात आले आहे. 

व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक तरुणी योगा मॅट आंथरते. तिच्यसोबत हा कुत्राही आपली योगा मॅट आंथरतो. इतकेच नाही पुढे ती जी आसने करते ती अगदी हुबेहूब तिच्याप्रमाणे करतो. आपण जे करतो तो योगा असतो मग डॉग जे करतो तो डोगा असे या मुलीने म्हटले आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत आम्ही मॅग्नसला सहभागी करुन घेतो असे ती म्हणते. मी माझ्या कुत्र्याला शिकवलेल्या गोष्टींशी तो लिंक करु शकतो हे पाहणे खूप सुखावह आहे असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या पाळीव प्राण्यासोबत वर्कआऊट करण्याचा तुमचा योग्य मार्ग कोणता असेही या पोस्टच्या माध्यमातून विचारण्यात आले आहे. कोरोनामुळे मागील काही वर्षे आपण सगळेच घरात आहोत. त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी घरातून करत असतानाही व्यायामही घरातून कऱणारे अनेक जण आहेत. मात्र अशाप्रकारे पाळीव प्राण्याला आपल्याप्रमाणे योगा शिकवणाऱ्या या मुलीचे आणि कुत्र्याचेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियायोगासने प्रकार व फायदेकुत्राइन्स्टाग्राम