सोशल मिडियावर लहान मुलांचे व्हिडिओ नेहमीच शेअर होतात. त्यापैकी काही व्हिडिओ खरोखरच बघण्यासारखे असतात. कारण त्यामध्ये लहान मुलांमधली निरागसता, त्यांचे अवखळ किस्से दाखवलेले असतात. त्यामुळे त्यांच्यातला तो निष्पाप कोवळेपणा (Innocent love between siblings) मग आपल्याही मनावरचा ताण कमी करून आपला मूडही फ्रेश करून टाकतो. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ गाजतो आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Amazing video of sibling's love shared by Anupam Kher) यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये २ लहान भावंडं दिसत आहेत. भाऊ साधारण ९ ते १० वर्षांचा तर बहिण ३ ते ४ वर्षांची आहे. ते दोघेही डायनिंग टेबलवर बसले असून जेवण करत आहेत.
ताकातली मिरची खाल्लीच नाही? करुन पाहा तिखट-आंबट ताकातली मिरची, पारंपरिक चमचमीत रेसिपी
भावाचं जेवण मोबाईल बघत सुरू आहे तर बहिण मात्र मन लावून एकाग्रतेने जेवत आहे. जेवताना बहिण एका बाऊलमधला बिस्किटासारखा दिसणारा एक पदार्थ उचलते आणि खायला लागते. तेवढ्यात भाऊही तो पदार्थ उचलण्यासाठी बाऊलमध्ये हात घालतो. पण त्यात काहीच नसतं. त्याचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये असल्याने बाऊलमध्ये तो पदार्थ आहे की नाही, हे त्याला समजतही नाही. पण बहिण मात्र हे सगळं बघत असते. भावाला ते खायचं आहे हे तिला कळाल्यावर ती हातातला पदार्थ पुन्हा त्या बाऊलमध्ये टाकून देते.
भाऊ मग तो पदार्थ उचलतो. सॉसमध्ये बुडवतो आणि बहिणीला खायला देतो. हे सगळं करताना त्याचं लक्ष मात्र मोबाईलमध्येच असतं. ते पाहून बहिण आपल्या भावावर जाम खुश होते.
केस वाढतच नाहीत? फक्त ३ गोष्टी वापरून तयार करा हेअरमास्क, केस वाढतील भराभर
भावंडांमधलं निरागस प्रेम अशा अर्थाने अनुपम खेर यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिली आहे. पण अनेक जणांना तो व्हिडिओ पाहून असं वाटत आहे की भाऊ एवढा मोबाईलमध्ये दंग झाला आहे की तो काय करतोय, हेच त्याला समजत नाहीये. ज्या दृष्टीकोनातून तुम्ही तो व्हिडिओ बघाल, त्यानुसार तुमच्यासाठी त्याचा अर्थ बदलत जाईल. म्हणून एकदा तुम्हीच व्हिडिओ बघा आणि नेमकं काय वाटतंय ते सांगा.