सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला पाण्याची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागातील पाण्याच्या कमतरतेबद्दल तुम्ही जाणून असाल पण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील परिस्थिती खूपच विदारक आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील आहे. येथील ग्रामपंचायत घुसिया, धिमरटोला येथे ग्रामस्थांना थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, (People risk their lives to quench their thirst people) गावाची अवस्था अशी आहे की, पाण्यासाठी ग्रामीण महिला व मुलांना जीव धोक्यात घालून ३० फूट खोल विहिरीत उतरावे लागत आहे. (India Woman Risking Life For Water)
पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात जीव गमवण्याचा धोका असल्याने गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्याच्या समस्येसाठी अर्जही केला होता , मात्र अजूनही गावाची स्थिती सुधारली नाही. धिमरटोला येथे सुमारे 550 कुटुंबे राहतात. गावातील चारही विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
विहिरीतच थोडेसे पाणी शिल्लक असते जे गावातील लोकांकडून गोळा केले जाते. तर कधी विहिरीत उतरून भांड्यात पाणी भरावे लागते, विहिरीशिवाय पाण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. अशा परिस्थितीत महिलांना जीव धोक्यात घालून रात्रंदिवस पाणी वाहून न्यावे लागत आहे. नळपाणी योजना मंजूर झाली आहे, मात्र ही योजना कमी ठिकाणी उपलब्ध झाल्यास संपूर्ण गावातील लोकांना पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नाही.
किचनमधली झुरळं, चिलटं ५ मिनिटात होतील दूर; पुदिन्याचा करा वापर
पाणी प्रश्नामुळे ग्रामस्थांमध्ये स्थानिक राजकीय नेत्यांबद्दल रोष आहे. पाणी नाही तर मतदान नाही अशा घोषणा केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनानाला या गावातील समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची चर्चा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावातील पाणी प्रश्न सुटतो का, याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.