सोशल मीडियावर लहान मुलांचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कधी मुलांचा खोडकरपणा खूप हसवतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये, एक लहान मूल त्याच्या वागण्यात कशी सुधारणा झाली याबद्दल बोलत आहे. लहान मुलाची गोंडस स्टाईल पाहून बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, तर अनेकांमध्ये हशा पिकला. (Viral video small kid says such funny thing father got into thinking after hearing)
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हे मुल किती निरागसपणे आपल्या हिंदी विषयातील स्पेलिंग दुरुस्त्याबद्दल सांगत आहे ते पाहू शकता. त्यानं एक एक शब्द बोलून दाखवला ज्यामुळे लोक हसले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'मी आता मोठा झालो आहे.' असं लिहिलंय. व्हिडिओमध्ये, एक लहान मूल पेन्सिल धरलेले दिसत आहे, त्याची एक वही त्याच्या समोर टेबलवर ठेवली आहे.तो चांगले शब्दलेखन कसे करू शकतो याबद्दल तो बोलू लागतो.
हे करत असताना मुल म्हणते, 'बाबा, मी लहान होतो तेव्हा मी ऋ पासून ऋषी चुकीचा लिहित होतो. आता मी मोठा झालो आहे, मला मला ते बरोबर लिहिता येते. लाखो लोकांना मुलाची बोलण्याची पद्धत आवडली, ज्यामुळे लोक हसले. हा व्हिडिओ 1 ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आला होता. ही क्लिप पोस्ट केल्यानंतर लगेच व्हायरल झाली आहे.
आतापर्यंत ही पोस्ट 10 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. या पोस्टवर लोकांच्या अनेक कमेंट्सही येत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'आता तू खूप मोठा झाला आहेस.' आणखी एका इंस्टाग्राम यूजरने लिहिले, 'क्यूट बेबी, माझ्या भाच्यासारखी.' तिसर्या युजरने लिहिले, 'इतकं गोंडस बाळ.'