Join us  

लेकानं आईसाठी घेतली लक्झरी कार; माऊलीनं स्टेअरींग हाती घेत सुसाट चालवली गाडी.. पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:41 AM

Viral Video : आपल्या आईसाठी लेकानं ही आगळीवेगली भेट आणली हीच गोष्ट किती खास आहे.

सध्या सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे लोकांच्या हृदयाला भिडतात. मुलं त्यांच्या पालकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. (Viral video son gave a luxury car to his mother she drove the car on the road) त्यांना  जगातील सर्व सुख त्यांना द्यायची असतात. मुलांना त्यांच्या पालकांनी असे क्षण जगावे असे वाटते जे त्यांनी यापूर्वी कधीही जगलेले नसतात. पालकांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यासाठी काहीही करण्यची त्यांची तयारी असते. असाच काहीसा प्रकार या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसला, ज्यामध्ये एका मुलाने आईला आलिशान कार दिली आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका आलिशान कारच्या ड्रायव्हिंग सीटवर एक महिला बसलेली दिसत आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसून ती तिच्या मुलाशी बोलत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप खास आहे आणि आपल्या मुलाशी बोलताना ती खूप आनंदी आहे. कारच्या आतील दृश्‍य पाहिल्यावर असे समजेल की हे वाहन खूपच लक्झरी आहे आणि त्यात अनेक हायटेक गोष्टी आहेत. मुलगा आईशी बोलतोय आणि आई साध्या साडीत गाडी चालवत आहे. रस्त्यावरून जाताना अनेक वाहने तिच्याजवळून गेली, पण त्या महिलेला गाडी चालवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव असल्यासारखे वाटले.

गॅस, जळजळ सकाळी पोट साफ होत नाही? ५ उपाय, पोटाचे आजार राहतील लांब

हा व्हिडिओ शेअर करत मुलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझी आई XUV 700 कार चालवत आहे.' हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर saikiran_kore नावाच्या युजरने शेअर केला आहे. त्यावर आतापर्यंत 18 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत, तर करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. साईकिरण अनेकदा असे व्हिडीओ पोस्ट करत राहतो आणि लोकांकडून लाईक्स मिळवतो. आईचा व्हिडिओ पोस्ट करून, फक्त एका व्हिडिओला त्यानं  2.5 कोटी व्ह्यूज मिळवले आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया