चहाला वेळ नसते पण वेळेला मात्र चहा हवाच! हिवाळ्यात चहाचा एक घोट मनाला सुखद अनुभूती देऊन जातो. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडी चांगलीच वाढली आहे. सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे, तर डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत आहे. मुंबईतही तापमानात कमालीची घट झाली असून थंडी वाढली आहे. अनेक राज्यांत पाऊसही पडत आहे. अशा स्थितीत विविध शहरांतील कडाक्याच्या थंडीने हैराण झालेल्या लोकांचे फोटोही सोशल मीडियावर येत आहेत. (Tea supply from water tap internet shocked to see it watch viral video)
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नळातून पाण्याऐवजी चहा बाहेर पडत आहेत. होय, ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, परंतु व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहू शकता.न ळातून कसा गरम चहाचा पुरवठा केला जात आहे आणि लोक रांगेत उभे राहून नळावरून चहा घेत आहेत.
बिकिनी घातलेल्या सारा खाननं स्पॉट गर्लला मुद्दाम पाण्यात ढकललं? व्हिडिओ पाहून नेटिझन्स भडकले
या व्हिडिओला आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक युजर्सनी कमेंटमध्ये लिहिलं आहे- कुठे चाललाय हा चहा भंडारा. हे ठिकाण नेमकं कुठे आहे, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. लोकांनी आपल्या चहाप्रेमी मित्र मैत्रिणींना टॅग केलं आहे. हा व्हिडीओ कुठे शूट केलाय हे अद्याप समोर आलेलं नाही.