सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओज व्हायरल होत असतात. खासकरन लग्नाचे व्हिडीओ ज्यात वधूवराची एंट्री, वरमाला घालतानाचे मजेशीर प्रसंग यांचा समावेश असतो. प्रत्येक लग्न समारंभाची एक वेगळी खासियत असते. लग्नकार्यात असं काहीतरी घडतं जे लोकांच्या आयुष्यभर लक्षात राहतं. (The bride threw rasgulla on the grooms mouth the groom slapped in anger the video went viral)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) नवरा नवरीची फ्री स्टाईल मारामारी पाहायला मिळतेय. रसगुल्ला खायला नकार दिल्यानं हा प्रकार इतका वाढला की भर मंडपात सर्व पाहूणे मंडळींसमोर नवरा नवरी मारामारी करू लागले.
#NDTVBeeps | वायरल : दूल्हे ने दुल्हन को मारा थप्पड़, शादी में जमकर हुई मारपीट pic.twitter.com/thx6CAQc7M
— NDTV India (@ndtvindia) March 3, 2022
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरा मुलगा आपल्या पत्नीला रसगुल्ला भरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण नवरी मुलगी मात्र तोंड उघडायला तयार नसते. मग रागाच्या भरात नवरा मुलगा हातात असलेला रसगुल्ला फेकून देतो.
बहिणीच्या पाठवणीवेळी ढसाढसा रडला भाऊ; गळाभेट घेत बोलला 'असं' काही, ऐकून तुमचेही डोळे पाणावतील
मग ती सुद्धा रसगुल्ला त्याच्या अंगावर फेकते. राग अनावर झाल्यानं नवरा तिला मारायला सुरूवात करतो. आतापर्यंत २० लांखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.