Join us  

Viral Video : 'ओ अंटावा' गाण्यावर तुफान नाचणाऱ्या नवरीला शेवटी नवराच म्हणाला, चला आता मंडपात.. पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 3:45 PM

Viral Video : मराठमोळ्या नवरीचा साजशृंगार करुन ओ अंटावा गाण्यावर डान्स, जोशात आलेल्या नवरीला नवरा थांबवतो आणि...नेटीझन्सची व्हिडिओला जोरदार पसंती...

ठळक मुद्देडान्स करताना तिचे हावभावही अतिशय उत्तम जमल्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ अगदी कमी वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.एका तरुणीसोबत या नवरीने धरलेला ठेका आपल्याला तिच्यातील उत्साह दाखवून देतो. 

लग्न म्हणजे नवरा आणि नवरीसाठी आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. या क्षणी नवरीच्या मनात मिश्र भावना असतात. एकीकडे नवीन आयुष्याची सुरुवात करणार म्हणून आनंद तर दुसरीकडे आपले घर माणसे सोडून जायची म्हणून दु:ख, तर आपल्याला लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या जमतील की नाही याचे दडपणही असतेच. याशिवाय लग्नाची खरेदी, सतत मेकअप आणि तयार होण्य़ाचा ताण, आलेगेलेल्यांची सोय पाहणे आणि या दगदगीमुळे होणारे जागरण असे सगळे करताना नवरी मुलगी शारीरिक आणि मानसिकरित्या पार थकून जाते. पण लग्न एकदाच होत असल्याने त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिड़िओवरुन (Viral Video) एक नवरी आपल्या लग्नातील क्षणांचा असाच आनंद घेत असल्याचे दिसते आहे (Dancing bride) .

 

या व्हिडिओमध्ये मराठमोळा साजशृंगार केलेली ही तरुणी प्रसिद्ध ‘पुष्पा’ (Pushpa - the rise) चित्रपटातील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या ‘ओ अंटावा’ (O antava) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून नेटीझन्सनी त्यावर रिल्सही केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे तिच्यासोबत तिचे मित्रमंडळी आणि नवराही आहे. यामध्ये या नवरीने पिवळ्या रंगाची म्हणजेच लग्नाच्या मुहूर्ताला नेसतात ती साडी नेसली असून त्यावर हार, मुंडावळ्या असा लग्नाचा सगळाच साज केलेला दिसतो. एका तरुणीसोबत या नवरीने धरलेला ठेका आपल्याला तिच्यातील उत्साह दाखवून देतो. 

डान्स करताना तिचे हावभावही अतिशय उत्तम जमल्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ अगदी कमी वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या नवरीचे नाव प्राची मोरे असून नवऱ्याचे नाव रोनक शिंदे आहे. केमिस्ट्री स्टुडिओज या इंस्ट्राग्राम पेजवर हा डान्सचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अवघ्या १५ ते २० दिवसांत तो जवळपास ५ लाख जणांनी त्याला लाईक केले आहे. तर अनेकांनी त्यावर हा व्हिडिओ आवडल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाची आणि लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ही नवरी एकदम जोशात नाचत असताना तिचा होणारा नवरा तिला ‘चला, चला’ म्हणत लग्नाच्या मंडपात घेऊन जातो. याआधीही अशाप्रकारे नवरीने आपल्याच लग्नात गाण्यांवर ठेका धरल्याचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्ननृत्य