Lokmat Sakhi >Social Viral > टीव्हीवर मॅच पाहताना लेकानं सेम टू सेम वडिलांसारखीच रिॲक्शन दिली, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले...

टीव्हीवर मॅच पाहताना लेकानं सेम टू सेम वडिलांसारखीच रिॲक्शन दिली, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले...

child's Viral video watching the match with father on tv : लेकरं इतकी निरागस असतात की मोठ्यांचं पाहूनच अनेक गोष्टी करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 11:40 AM2022-12-29T11:40:15+5:302022-12-29T17:54:52+5:30

child's Viral video watching the match with father on tv : लेकरं इतकी निरागस असतात की मोठ्यांचं पाहूनच अनेक गोष्टी करतात.

Viral video watching the match with father on tv the childs reaction won the heart started doing mimicry like dad | टीव्हीवर मॅच पाहताना लेकानं सेम टू सेम वडिलांसारखीच रिॲक्शन दिली, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले...

टीव्हीवर मॅच पाहताना लेकानं सेम टू सेम वडिलांसारखीच रिॲक्शन दिली, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले...

लहान मुलं घरातील सदस्यांचे अनुकरण करतात हे तुम्ही ऐकूनच असाल.  त्यांनी काही केलं तर मुलंसुद्धा त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलगा वडीलांची हूबेहूब नक्कल करताना दिसत आहे. (Viral video watching the match with father on tv the childs reaction won the heart started doing mimicry like dad)

ट्विटरवर @buitengebiden शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वडील आणि मुलगा टीव्हीवर एकत्र सामना पाहताना दिसत होते आणि वडिलांनी आनंदाने रिएक्शन दिली आणि सोफ्यावर पडताच मुलाने त्याच्याकडे पाहिले आणि वडिलांच्या शैलीची अगदी नक्कल करत मागे वळून पाहिले. मुलाची ही मिमिक्री लोकांना खूप आवडली. व्हिडिओला 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये 2 ते 3 वर्षाचा एक मुलगा आपल्या वडिलांसोबत टीव्हीवर सामना पाहत होता. वडिलांप्रमाणेच मूलही खूप उत्साही दिसत होते. सामना जिंकल्यावर आणि हरल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया आणि हावभाव त्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. पुढच्याच क्षणी मॅचमध्ये काहीतरी घडलं. वडिलांनी डोक्यावर हात मारला आणि परत सोफ्यावर पडले.

वडिलांना असे करताना मुलाने पाहिल्याबरोबर चिमुरड्यानं स्वतःच डोके धरले आणि मागच्या सोफ्यावर झोपला. वडिलांची अशी नक्कल करणाऱ्या मुलाला पाहून लोक खूप हसले आणि त्याची मिमिक्री लोकांच्या मनाला बरीच भिडली. व्हिडीओने हे सिद्ध की, मुले जे पाहतात त्याचे पालन करतात. खरे तर पालक हे मुलांसाठी आदर्श असतात. म्हणूनच ते नेहमी त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतात.

म्हणूनच आपल्या मुलांना कसे घडवायचे हे महत्त्वाचे आहे, आपण मुलांबरोबर आणि त्यांच्यासमोर कसं वागलं पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे.  यामुळे कोणत्याही कठोर प्रशिक्षणाशिवाय तो एक चांगला माणूस घडेल. व्हिडिओतील मुलाची स्टाइल लोकांना इतकी आवडली की 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Web Title: Viral video watching the match with father on tv the childs reaction won the heart started doing mimicry like dad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.