लग्नाचा सिजन सुरू आहे. अशात नाचणे, गाणे हे सर्रास सुरू असते. आणि असे होऊ शकत नाही की वधू-वरांच्या मित्रांनी लग्नघरात गोंधळ घातला नाही. मित्र मैत्रिणींच्या मस्तीशिवाय लग्न अपूर्ण वाटतं. नुकताच लग्नघरातील मित्रांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्नाच्या संगीत फंक्शनमध्ये वराच्या मित्रांनी जबरदस्त डान्स केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी साडी नेसून डान्सही केला. या व्हिडीओतील वराच्या बेस्ट फ्रेंड्सचा डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. (Wedding reception groom best friends danced with wore saree seeing video you cant control your laugh)
माधुरीच्या गाण्यावर जबरदस्त डान्स
संगीत फंक्शनमध्ये, वराचे मित्र माधुरी दीक्षितच्या सर्वात लोकप्रिय गाण्यावर जोरदार नाचताना दिसत आहेत. इतकंच नाही तर सगळ्यांनीच माधुरीच्या स्टेप्स खूप छान केल्या आहेत. व्हिडिओतील या मुलांची कृती आणि एक्सप्रेशन तुम्हालाही आश्चर्यचकित करेल. हा व्हिडिओ इतका लोकप्रिय झाला आहे की तो 3 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.
युजर्सकडून कमेंट्सचा पाऊस
लोक या व्हिडिओवर एकापेक्षा एक कमेंट करत आहे. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले- अरे, सर्व स्टेप्स केल्यानंतर मग काय उरले. तर दुसरीकडे दुसर्या युजरने लिहिले - जर तुमचे अप्रतिम डान्स मित्र असतील तर....यांची मैत्री पाहून एका यूजरने कमेंट करत लिहिले - मित्रांनो, तुम्ही डान्स करताना मस्त दिसता.