Join us  

आजीबाईंची कमाल दे धमाल, नातवानं दिलेलं चॅलेंज स्वीकारत आजीबाईंचं जोरदार वेटलिफ्टिंग- पाहा व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 12:48 PM

Social Viral: नातवाने दिलेलं चॅलेंज पुर्ण करण्यासाठी आजीबाईंनी जो पराक्रम केला आहे, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे..(weight lifting by 80 years old women)

ठळक मुद्देआजीबाईंचा हा जोश पाहून त्यांचा नातूच काय, पण अख्खा सोशल मिडियाच अचंबित झाला आहे..

'आपल्याकडून आता दगदग होत नाही बुवा..', अशी वाक्यं आजकाल तिशी- चाळिशीतच अनेक जण सहज बोलून जातात. किंवा वय झालं असं स्वत:च स्वत:चा समज करून घेतात आणि मग वय झालंय असं समजून बऱ्याच गोष्टी करणं टाळतात. तुमचाही स्वत:विषयी असा काही समज असेल, किंवा मग आपल्याला अमूक गोष्ट जमणार नाही, झेपणार नाही, असं स्वत:विषयी समज तयार करून घेतला असेल, तर या आजीबाईंचा हा धमाकेदार व्हिडिओ (Viral Video) एकदा बघायलाच हवा.. 

 

इन्स्टाग्रामच्याpunjabi_industry__ या पेजवर शेअर करण्यात आलेला वयस्कर महिलेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधल्या आजी मुळच्या पंजाब- हरियाणा या प्रांतातल्या असाव्यात, असे वाटते. पांढरे झालेले केस, अंगावरचे सुरकुत्यांचे जाळे यावरून तर आजीबाई नक्कीच ७५ वर्षांच्य पुढच्या असतील असे वाटते. या आजींना नातवाने वेटलिफ्टिंगचे (weight lifting) चॅलेंज दिले..

 

आजी या वयात कसलं काय करू शकणार, असं त्याने मनोमन ठरवलं आणि तो आजीची मजा बघत बसला. पण आजीबाई आल्या आणि त्यांनी मात्र कमालच केली. खाली वाकल्या आणि मोठ्या ताकदीने वेटलिफ्टिंग केलं. खरं आश्चर्य तर पुढेच आहे. बारबेल नुसतं उचललंच नाही, तर दोन्ही हात वर करून एखाद्या मुरलेल्या वेटलिफ्टरप्रमाणे ते डोक्याच्या वरही नेलं.. आजीबाईंचा हा जोश पाहून त्यांचा नातूच काय, पण अख्खा सोशल मिडियाच अचंबित झाला आहे.. या आजींनी या वयात हा उत्साह कुठून आणला? असा फिटनेस मिळविण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यसाठी तुम्ही नेमकं खाता तरी काय? असा प्रश्न आता त्यांना विचारला जात आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्राममहिलाफिटनेस टिप्स