Join us  

स्वत:च्या चुकीमुळे स्कूटी स्लिप झाली; तरी मागच्या बाईकवाल्याशी भांडली तरुणी; पाहा व्हिडिओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:43 AM

Viral Video Girl's Scooty Slipped : चूक आपली की दुसऱ्याची याचा विचार न करता थेट भांडायलाच लागणाऱ्या रोड रेजचं हे एक उदाहरण आहे.

अनेक वेळा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून हसणं थांबवताच येत नाही. (Viral Video) असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी बाईकवाल्याशी भांडताना दिसत आहे. वास्तविक, ही मुलगी डबल सीट स्कूटीवरून जात होती. पण अचानक रस्त्याच्या मधोमध असे काही घडते की स्कूटी घसरते आणि त्यावर स्वार असलेले हे दोघे खाली पडतात. (Viral video what girl scooty slipped and she fought biker while guy was far behind See viral video)

ट्राफिक असलेल्या रस्त्यावर एक दुचाकी स्लिप होते. त्यावरचे दोघेही खाली पडतात. सुदैवानं कुणाला लागत नाही. मागून येणारं वाहनही लांबच असतं. मात्र काय झालं हे पाहून मागचा बाइकवाला आपला स्पीड कमी करतो, मात्र त्यानंच आपल्याला ठोकलं असं वाटून स्कुटरवरची तरुणी थेट त्याच्याशी भांडायलाच लागते.

 हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिलासादायक बाब म्हणजे व्हिडिओमध्ये स्कूटीवरून पडलेले दोघेही सुखरूप असल्याचे दिसत आहे.   जन्मत:च दृष्टी नव्हती, ऑपरेशननंतर पहिल्यांदा जग पाहून चिमुरडीनं 'अशी' रिएक्शन दिली, पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल असून त्यावरुन अनेकजण चर्चा करत आहेत. व्यक्तिगत आयुष्यापासून राजकीय संदर्भांपर्यंत लोक तर्क लावत आहेत. कुणाची चूक, कुणाला दोष, कुणाचा आत्मविश्वास, कुणावर आरोप आणि एकूणच जगण्यातला विरोधाभास यासाऱ्याला जोडत नेटिझन्स हसत आहेत आणि म्हणत आहेत की, आजकाल कधी काय होईल नी काय आपल्या समोर अचानक येईल याचा काही नेम नाही.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलअपघात