Join us  

Viral Video: बघा ८३ वर्षांच्या आजीबाईंची सगळ्यात मोठी मिळकत... सोशल मिडियावर आजीबाईंचीच चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 2:19 PM

Viral Video of a Big Indian Family: ८३ वर्षांच्या आजीबाईंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल (viral video) झाला आहे.. यामध्ये या आजींनी त्यांची आयुष्यातली सगळ्यात मोठी मिळकत कोणती, ते सांगितलं आहे...

ठळक मुद्देआजकाल न्युक्लिअर फॅमिलीचा ट्रेण्ड वाढत असताना, असं एकत्र राहणारं भलंमोठं कुटूंब बघणं नेटकरींना भारीच आवडलं आहे. 

आयुष्याच्या शेवटी आपण काय मिळवलं, काय गमावलं, यासगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. कुणासाठी आर्थिक स्वरुपातली मिळकत मोठी असते तर, कुणासाठी मित्रमैत्रिणींची सोबत लाखमोलाची ठरते. कुणाला मुलं नाव कमावून चांगली मोठी झाली, यातच समाधान असतं तर कुणासाठी आयुष्यभर कमावलेलं नाव प्यारं असतं.. अशीच एका आजीबाईंची मिळकत सध्या सोशल मिडियावर (social media) चर्चेचा विषय ठरली आहेत. 

 

इन्स्टाग्रामच्याofficialhumansofbombay या पेजवर नुकताच एक व्हिडिओ शेअर (instagram share) करण्यात आला आहे. यामध्ये मोठंच्या मोठं दक्षिण भारतीय कुटूंब दाखविण्यात आलं आहे. अवघ्या ८ ते १० सेकंदाचा हा व्हिडिओ. पण सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. अवघ्या २ दिवसांपुर्वी शेअर झालेल्या या व्हिडिओला तब्बल अडीच लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. ''At 83, my proudest achievement is.....'' अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. आपलं कुटूंब हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठी मिळकत आहे, असं या आजीबाई सांगत आहेत.

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की घरातल्या एका जीन्यावर आजींचं सगळं कुटूंब जोडीजोडीने बसलेलं आहे. एकूण ७ जोड्या या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. जीन्याच्या खाली सगळ्यात समोर एक स्टूल टाकला आहे. आजी हसत हसत येतात आणि त्या स्टुलवर येऊन बसतात. कुणाच्यातरी गळ्यात घालावा त्याप्रमाणे त्या त्यांचा हात फिरवतात. त्यांची ही कृती झाली की इतर सगळे पुरुषही हात हलवतात आणि त्यांच्या बायकांच्या गळ्यात घालतात. व्हिडिओ अतिशय छोटा असला तरी खूपच देखणा झाला आहे.

येतं सगळं पण कॉन्फिडन्सच मार खातो? आत्मविश्वास वाढविण्यासाठी ५ सोप्या टिप्स, घ्या बिंधास्त भरारी!

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आजीबाई म्हणतात की माझी ५ मुलं, सुना, नातवंड, पतवंड आम्ही सगळे केरळमध्येच एकाच घरात राहतो. माझ्या या परिवाराला असं एकत्र हसत- खेळत बघणं हा खरोखरंच माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. पतीच्या निधनाला ९ वर्षे झाली. आयुष्यातला मोठा आधार हरपला. आमचं सगळ्यांचंच आयुष्य त्यानंतर बदललं. पण तरीही आताही आम्ही एकत्र आहोत आणि माझी मुलं हीच माझा मोठा आधार झाली आहेत. आजकाल न्युक्लिअर फॅमिलीचा ट्रेण्ड वाढत असताना, असं एकत्र राहणारं भलंमोठं कुटूंब बघणं नेटकरींना भारीच आवडलं आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामकेरळपरिवार