सोशल मीडिया विवाहाशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. प्रत्येक लग्न समारंभात पाहूणे आणि मित्र मंडळींच्या नजरा नवरा नवरीकडे असतात. (Viral Wedding Video ) अशात काही विनोद झाला तर तुफान व्हायरल होताना तुम्ही पाहिला असेल. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. (Wedding video the groom was talking to another girl then bride did such a thing)
समोर आलेला हा लग्नातला व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर लग्नाच्या मंचावर बसले आहेत. दुसरी मुलगी वराच्या शेजारी बसलेली दिसते. त्याचवेळी वर त्या मुलीशी सतत बोलताना दिसतो. या प्रकरणामध्ये वरही आपल्या नव्या वधूकडे दुर्लक्ष करतो. वराची ही कृती पाहून वधू अस्वस्थ होते. यानंतर व्हिडिओमध्ये जे घडते ते खूपच मजेदार आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधू तिच्या वराच्या सतत बोलण्यामुळे खूप अस्वस्थ होते. ती वारंवार तिच्या वराला अडवते, पण वर सतत तिच्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या मुलीशी बोलत असते. वराच्या या सगळ्या कृती लग्नाला आलेल्या पाहुण्यांनाही पाहायला मिळतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधूला सतत अडवल्यानंतरही, जेव्हा वर सहमत होत नाही, तेव्हा वधूला थोडा राग येतो.
वधू एकदा जबरदस्तीने वराला अडवते आणि त्याच्या डोक्यावर मारते. डोक्यावर चापट मारल्यानंतर, वर वळून वधूकडे पाहतो. वधूच्या या कृतीवर वर आणि एकत्र बसलेली मुलगी जोरजोरात हसायला लागते. व्हिडीओ बघायला खूप क्यूट दिसत आहे. हा व्हिडिओ unzip.world नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 19 लाख लोकांनी लाईक केले आहे.