Join us  

आईचं डोकंच भारी! लेकरासाठी तिने सायकलवरच तयार केलं स्पेशल सीट; पाहा आईच्या मायेचं आगळं रुप.. व्हायरल व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 4:23 PM

Virla Video Of Mother and Son Innovative Cycle Seat Shared by Harsh Goenka : प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ठळक मुद्देया महिलेच्या कल्पकतेचे आणि काळजीपोटी तिने केलेल्या या अनोख्या गोष्टीचे नेटीझन्स मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.हर्ष गोयंका माध्यमातून ते सतत काही ना काही शेअर करत आपल्या फॉलोअर्सना प्रेरणा देण्याचाही प्रयत्न करत असतात. 

आई तिच्या लेकरांसाठी काय करते हे तिला आणि तिच्या पिलांनाच माहित. आपल्या मुलाने नीट खावे, नीट शिकावे किंवा अगदी समाजात वावरताना तो उत्तम व्यक्ती व्हावा यासाठी जन्मापासून ती माऊली झटत असते. आपल्या मुलांना जगातील सगळी सुखं मिळावीत आणि त्यांना जास्त कष्ट पडू नयेत असेही त्या मातेला वाटत असते. त्यासाठी ती रात्रीचा दिवस करुन झटत राहते. आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ही माता काही ना काही खटपट कायम करत असते. नुकतेच याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक आई आपल्या लहानग्या मुलाला सायकलवरुन नेताना दिसत आहे (Virla Video Of Mother and Son Innovative Cycle Seat Shared by Harsh Goenka). 

(Image : Google)

सायकलवरुन प्रवास करणे हे खेडेगावामध्ये आजही अतिशय सामान्य असले तरी या आईची कल्पनाशक्ती पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या सायकलवर नीट बसता यावे म्हणून या मातेने अशी सीट तयार केली आहे की पाहून चारचाकी गाडीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला सायकल चालवताना दिसते. हे दोघेही या राईडचा आनंद घेताना दिसत आहेत. कारमध्ये ज्याप्रमाणे चाइल्ड़ सीट असते, त्याचप्रमाणे या मातेने आपल्या मुलासाठी सायकलला चाइल्ड सीट लावून घेतली आहे. एक आई आपल्या मुलासाठी काय करत नाही असे कॅप्शन या ९ सेकंदांच्या व्हिडिओला देण्यात आले आहे. 

या व्हिडिओला १८ लाख व्ह्यू मिळाले असून हजारो जणांनी तो लाईक केला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी हा व्हिडिओ रिट्वीट केला असून बऱ्याच जणांनी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. गरज शोधाची जननी आहे या आशयाच्या प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. तर या महिलेच्या कल्पकतेचे आणि काळजीपोटी तिने केलेल्या या अनोख्या गोष्टीचे नेटीझन्स मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. हर्ष गोयंका सोशल मीडियावर बरेच अॅक्टीव्ह असतात. इतकेच नाही तर या माध्यमातून ते सतत काही ना काही शेअर करत आपल्या फॉलोअर्सना प्रेरणा देण्याचाही प्रयत्न करत असतात. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया