Join us  

तब्बल ८३ लाख पगार देतो पण मुले सांभाळायला मदतनीस हवी, अमेरिकन राजकीय नेत्यासमोर मोठा प्रश्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2023 12:11 PM

Vivek Ramaswamy looking for a nanny, starting salary is ₹80 lakhs : अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची तयारी करणाऱ्या विवेक रामास्वामींसमोर मोठा पेच...

सध्याच्या या महागाईच्या काळात एका घरात किमान दोघं तरी कमावणारे हवेच. त्यात मुलांचा योग्य तो सांभाळ करण्यासाठी जास्तीचा खर्च हा येतोच. अशावेळी दोघ नवरा बायकोनी कमावणे भागच असते. शहरासारख्या भागात राहताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. अशावेळी आपल्या लहान मुलांचा सांभाळ कोण करणार हा प्रश्न प्रत्येक जोडप्यापुढे उभा राहतो. घरात जर आजी - आजोबा असतील तर ते दिवसभर त्याचा सांभाळ करतात. परंतु काहीवेळा ते देखील शक्य होत नाही. अशा परिस्थिती, काही पालकांना आपल्या मुलांना डे - केअर सेंटर किंवा घरीच त्यांना सांभाळणारी आया बोलवून तिच्या जीवावर ठेवून ऑफिस गाठावे लागते. या डे - केअर सेंटर किंवा आया यांचा पगार देखील द्यावा लागतो(Vivek Ramaswamy wants to hire nanny for his two sons. Salary is 80 lakh).

आजच्या काळात आपण घरात मुलांना सांभाळणारी आया ठेवली तर तिला कमीत कमी १० ते १५ हजार पगार द्यावा लागतो. पण, एका भारतीय -अमेरिकन अब्जाधीशाने आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी देऊ केलेली आयाची नोकरी पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल. कारण आया म्हणून काम करणाऱ्या बाईला लाखोंमध्ये पगार मिळणार आहे. फक्त पगारच नाही तर ही नोकरी मिळाली तर आपण किती 'श्रीमंत' आहोत, अशी भावना तुमच्या मनात येईल. भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक (Vivek Ramaswamy) विवेक रामास्वामी (Is Vivek Ramaswamy offering over Rs 80 lakh to hire a nanny?) हे आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी एका नॅनीच्या शोधात आहेत. या नॅनीचा पगार म्हणून ते तिला थोडा - थोडका नाही तर चक्क लाखोंच्या घरात पगार देणार आहेत, सोबतच एक आलिशान भव्यदिव्य लाईफस्टाईल जगण्याची देखील संधी मिळणार आहे. पाहूयात तर नेमकी ही जाहिरात आहे तरी काय?(Indian American Vivek Ramaswamy wants to hire nanny for his sons with 80 lakh salary).

नक्की कोणत्या प्रकारचा आहे हा जॉब ? 

भारतीय - अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांनी २०२४ मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाच्या (US Presidential  Election) उमेदवारीसाठी उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यासह, रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी निवडणूक लढवणारे ते निक्की हेलीनंतरचे दुसरे भारतीय - अमेरिकन नेते ठरले आहेत. उद्योजक विवेक रामास्वामी यांना दोन मुलगे आहेत. विवेक रामास्वामी आपल्या या दोन मुलांची काळजी घेणारी नॅनी, म्हणजेच मुलं सांभाळणारी आयाच्या शोधात आहेत. EstateJobs.com या अमेरिकन जॉब एजन्सीद्वारे त्यांनी आयासाठीच्या पदासाठी जाहिरात दिली आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी आयाची गरज असल्याचं या जाहिरातीत म्हटलं आहे. या नोकरीसाठी पगार म्हणून १,००,००० डॉलर्स म्हणजेच सुमारे ८३ लाख रुपये दिले जातील. भारतीय - अमेरिकन अब्जाधीशाने आपल्या घरगुती कामातील कर्मचारी वाढवण्यासाठी ही जाहिरात दिली आहे, ज्यामध्ये आयाचं पद सध्या रिक्त आहे.   

कियाराच्या आईने लाडक्या लेकीसाठी केले खास सिंधी पदार्थ, कियारा इमोशनल होत म्हणाली...

नेलपेंट इतकी महाग की त्या पैशात येतील ३ मर्सिडीज कार, ही नेलपेंट इतकी महाग का ?

या जाहिरातीत अजून काय आहे खास ? 

१. उच्च-प्रोफाइल कुटुंबाशी कनेक्ट होण्याची आणि काम करण्याची संधी.२. दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी लाखोंचा पगार.३. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याचीही संधी मिळेल.४. श्रीमंत कुटुंबासोबत राहण्याची आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी.५. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय किमान २१ असावं.

मोठ्ठा काळा फुटबॉल बनून रॅम्पवर आली मॉडेल, चालता चालता हरवली इतकी बिथरली की...

पॅरिस फॅशन वीकमध्ये घडले ‘असे’ काही, ज्याची कुणालाच कल्पना नव्हती, स्कर्टवर पेटले दिवे आणि फुलपाखरांची तर...

प्रायव्हेट जेटमधून फिरण्याची संधी... 

या आयाच्या नोकरीसाठी निवडलेल्या व्यक्तीला दर आठवड्याला कुटुंबासह खासगी जेटमधून प्रवास करण्याची संधीही मिळणार आहे. असं महिन्यातून अनेक वेळा होऊ शकतं, कारण रामास्वामी यांचे कुटुंबीय अनेकदा प्रायव्हेट जेटने प्रवास करतात. या कुटुंबात केवळ आयाच काम करत नाहीत, तर शेफ, हाऊसकीपर्स आणि खाजगी सुरक्षेसोबतच इतर घरगुती काम करणाऱ्या मदतनीसांचा मोठा स्टाफ देखील आहे.

एक आठवडा काम, एक आठवडा सुट्टी ... 

या नोकरीसाठी निवडलेल्या व्यक्तीला साप्ताहिक रोटाप्रमाणे काम करावं लागेल. साप्ताहिक रोटा म्हणजे या व्यक्तीला एक आठवडा काम करावं लागेल आणि एक आठवडा सुट्टी मिळेल. अशा प्रकारे, त्या व्यक्तीला एका वर्षात फक्त २६ आठवडेच काम करावं लागेल. एवढंच नव्हे तर याचा पगार सुमारे १ लाख डॉलर असेल. रामास्वामी यांच्या कुटुंबात २ मुलं आहेत. एकाचं वय ३.५ वर्षे आणि दुसऱ्याचं १ वर्ष आहे. मुलांकडे लक्ष देणं आणि त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं हे आयाचं काम असतं, हे एवढंच काम करुन जर कुणाला लाखोंमध्ये पगार मिळत असेल तर अजून काय हवं ?

टॅग्स :सोशल व्हायरल