Lokmat Sakhi >Social Viral > Wall Seepage Preventions & Solutions : पावसाळ्यात सतत पाणी लागून भिंती खराब होतात? ४ टिप्स, भिंतीचा रंग, क्वालिटी नेहमी राहील चांगली

Wall Seepage Preventions & Solutions : पावसाळ्यात सतत पाणी लागून भिंती खराब होतात? ४ टिप्स, भिंतीचा रंग, क्वालिटी नेहमी राहील चांगली

Wall Seepage Preventions & Solutions उन्हाळ्यातच असे पाईप्स दुरुस्त करून घ्या, ज्यातून छताचे पाणी निघून जाते किंवा अंगण, स्वयंपाकघर इत्यादींचे पाणी बाहेर जाते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:48 PM2022-06-08T18:48:44+5:302022-06-08T18:56:31+5:30

Wall Seepage Preventions & Solutions उन्हाळ्यातच असे पाईप्स दुरुस्त करून घ्या, ज्यातून छताचे पाणी निघून जाते किंवा अंगण, स्वयंपाकघर इत्यादींचे पाणी बाहेर जाते

Wall Seepage Preventions & Solutions : How To Prevent Water Seepage In Walls  | Wall Seepage Preventions & Solutions : पावसाळ्यात सतत पाणी लागून भिंती खराब होतात? ४ टिप्स, भिंतीचा रंग, क्वालिटी नेहमी राहील चांगली

Wall Seepage Preventions & Solutions : पावसाळ्यात सतत पाणी लागून भिंती खराब होतात? ४ टिप्स, भिंतीचा रंग, क्वालिटी नेहमी राहील चांगली

पावसाळा आला की, काही घरांमध्ये भिंतीही ओलसर होऊ लागतात. जवळजवळ प्रत्येक जुन्या घरात इतका ओलसरपणा दिसून येतो की घरातील लोकांना राहणे कठीण होते. घरामध्ये खूप ओलसरपणा असेल तर भिंती खराब होतात, परंतु त्याच वेळी किटक देखील घरात प्रवेश करतात. (Home Hacks) भिंतींना सील करणे स्वच्छतेच्या दृष्टीने चांगले नाही. मग पावसाळ्यात घर स्व्च्छ राहण्यासाठी काय करावं असा प्रश्न पडतो. (How To Prevent Water Seepage In Walls) पावसाळ्यात सतत पाणी लागून भिंतीना आणि सिलिंगला बुरशीसुद्धा येते. पावसाळा सुरू होण्याआधी काही उपाय केले तर तुम्ही भिंतींचं नुकसान होण्यापासून वाचू शकता. (How do i stop water seepage in my walls)

पावसाळ्यात भिंती, सिलिंग खराब होतात? (What causes water seepage in walls)

जमिनीच्या आतील ओलावा वरच्या भागात पोहोचतो आणि भिंतींना नुकसान पोहोचवते. पावसाचे पाणी कमकुवत भिंतीवर सतत पडल्यास भिंतीमध्ये ओलसरपणा निर्माण होतो. घराच्या छतावर पाणी साचल्यास ओलसरपणा येऊ शकतो. ड्रेनेज पाईप्स ब्लॉक केल्याने पाणी जमा होऊ शकते आणि ओलसरपणा होऊ शकतो.

लिकेज असलेल्या ठिकाणी वॉटर प्रोटेक्शन

ज्या ठिकाणी नेहमीच गळती होते त्या ठिकाणी तुम्ही वॉटर प्रोटेक्शन लावू  शकता. तुमच्या घराच्या त्या भागाचे प्लास्टर घासून काढा. फुगल्यानंतर ते अगदी सहज निघून जाईल. यानंतर सिमेंटमध्ये मिसळून झोरोक्रेट 008W इत्यादी  वॉटर प्रोटेक्शन रसायन लावा. हार्डवेअर स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असलेले कोणतेही वॉटर प्रोटेक्शन रसायन तुम्ही घेऊ शकता.

जिथे पाणी साचतं तिथे प्लास्टर करून घ्या

जिथे पाणी साचले असेल, म्हणजे छतावर, घराच्या अंगणात, भिंतींच्या आजूबाजूला इत्यादी, तेथे तुम्ही घराच्या स्वच्छतेनंतर प्लास्टर करून घ्या किंवा मेण घासून घ्या. याशिवाय, तुम्ही चांगल्या दर्जाचे वॉटरप्रूफ कोटिंग करून घेण्यासारखे अनेक पर्याय निवडू शकता. ही पद्धत आपल्या घरातील पाणी साचत असलेल्या जागेचे मोठ्या प्रमाणात संरक्षण करू शकते.

फक्त १ गोळी चघळा नको असलेली गर्भधारणा टाळा! समोर आला प्रेग्नंसी रोखण्याचा नवा उपाय 

पाईप दुरूस्त करा

उन्हाळ्यातच असे पाईप्स दुरुस्त करून घ्या, ज्यातून छताचे पाणी निघून जाते किंवा अंगण, स्वयंपाकघर इत्यादींचे पाणी बाहेर जाते. हे पाईप भिंतींमध्ये ओलसरपणाचे सर्वात मोठे कारण बनतात. हे पाईप आता दुरुस्त केले तर ते सेट होण्यास वेळ मिळेल आणि पाण्याचा अडथळा होणार नाही. ते फक्त उन्हाळ्यातच स्वच्छ करावेत.

वटपौर्णिमेला ट्राय करा पारंपरिक तितकाच मॉर्डन मराठमोळा लूक; लेटेस्ट आयडिया पाहा एका क्लिकवर

भिंतीच्या भेगा दुरूस्त करा

भिंतींमधील तडे सील करणे खूप महत्वाचे आहे. पाण्याची सर्वाधिक गळती येथूनच होते. लवकर घराची डागडुजी केली तर सिमेंट वगैरे सुकायला वेळ मिळेल आणि अशा परिस्थितीत पावसाळ्यापर्यंत घराला चांगला आधार मिळेल.
 

Web Title: Wall Seepage Preventions & Solutions : How To Prevent Water Seepage In Walls 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.