आजकाल बहुतांश घरांमध्ये वॉशिंग मशीन असते (Washing Machine). वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे सोपे होते. कमी वेळात, मेहनत न घेता, अगदी काही मिनिटात कपडे धुवून निघतात (Electricity bill). परंतु, रोजच्या वापरामुळे आणि लहान चुकांमुळे वॉशिंग मशीन लवकर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लहान चुका सामान्य जरी वाटत असल्या तरी, याच चुकांमुळे वॉशिंग मशीन खराब होऊ शकते. दुरुस्त करताना जास्त खर्चही होऊ शकते. त्यामुळे वॉशिंग मशीन वापरताना या चुका नक्कीच टाळा(Washing machine errors: how to avoid the most common mistakes).
वॉशिंग मशीन वापरताना कोणता चुका टाळायला हव्या
मशीन ओव्हरलोड
वॉशिंग मशीन ओव्हरलोड केल्याने मोटर, ड्रम आणि बियरिंग्सवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे तांत्रिक बिघाड होऊ शकते.
पावसाळ्यात ५ प्रकारच्या डाळी 'या' पद्धतीने खाल तर पचनक्रिया बिघडेल; वजनही वाढेल
जास्त डिटर्जंट वापरू नका
कपडे धुताना अधिक डिटर्जंटचा वापर केल्याने जास्त फेस तयार होतो. ज्यामुळे वॉशिंग मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शिवाय्य ड्रम आणि पाईप खराब होऊ शकतो.
देखभालीकडे दुर्लक्ष
वॉशिंग मशीनचा व्यवस्थित वापर न झाल्यास लवकर खराब होऊ शकते. तसेच पाण्याच्या पाईपची तपासणी करीत राहा. पाईप गळतीमुळे वॉशिंग मशीनमध्ये पाणी जमा होऊ शकते. त्यामुळे वेळोवेळी पाईप स्वच्छ करत राहा.
ओले कपडे जास्त वेळ वॉशिंग मशीनमध्ये ठेवू नका
ओले कपडे अधिक वेळ वॉशिंग मशीनमध्ये ठेवू नका. यामुळे ड्रममध्ये बुरशी वाढू शकते. कालांतराने वॉशिंग मशीन खराब होते.
कंपनीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका
वापर आणि देखभालीसाठी कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास मशीन लवकर खराब होते.