Lokmat Sakhi >Social Viral > कमाल! NASA नं अंतराळात उघडलं सलून; शून्य गुरुत्वाकर्षणात भारतीय अंतराळवीर बनला हेअर स्टायलिस्ट

कमाल! NASA नं अंतराळात उघडलं सलून; शून्य गुरुत्वाकर्षणात भारतीय अंतराळवीर बनला हेअर स्टायलिस्ट

NASA share video of astronauts get a fresh trim in zero gravity space haircuts : या व्हिडिओमध्ये शास्त्रज्ञांनी शून्य गुरुत्वाकर्षणात केस कापण्याची प्रक्रिया दाखवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:38 PM2021-12-23T12:38:30+5:302021-12-23T14:54:16+5:30

NASA share video of astronauts get a fresh trim in zero gravity space haircuts : या व्हिडिओमध्ये शास्त्रज्ञांनी शून्य गुरुत्वाकर्षणात केस कापण्याची प्रक्रिया दाखवली आहे.

Watch hair cutting in space nasa share video of astronauts get a fresh trim in zero gravity space haircuts | कमाल! NASA नं अंतराळात उघडलं सलून; शून्य गुरुत्वाकर्षणात भारतीय अंतराळवीर बनला हेअर स्टायलिस्ट

कमाल! NASA नं अंतराळात उघडलं सलून; शून्य गुरुत्वाकर्षणात भारतीय अंतराळवीर बनला हेअर स्टायलिस्ट

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) अंतराळवीरांचे केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या फुटेजमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (IAS) पोहोचलेल्या अंतराळवीरांचे केस कापल्याचे दाखवण्यात आले आहे. गेल्या महिन्यात, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने SpaceX क्रू-3 मिशनद्वारे चार अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर  (ISS) पाठवले. त्यात भारतीय वंशाचे अंतराळवीर राजाचारी यांचाही समावेश आहे. (NASA share video of astronauts get a fresh trim in zero gravity)

शुन्य गुरूत्वाकर्षणात केस कापले

व्हिडिओमध्ये शास्त्रज्ञांनी शून्य गुरुत्वाकर्षणात केस कापण्याची प्रक्रिया दाखवली आहे. अशा विशिष्ट परिस्थितीत केस कापणे नेहमीच आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत अंतराळवीरांनी या कामासाठी विशेष उपकरणे वापरली. मोठी गोष्ट म्हणजे भारतीय वंशाचे अंतराळवीर आणि मिशन कमांडर राजा चारी यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर हेअर कटिंगमध्ये केशभूषाकाराची भूमिका बजावली. ते युरोपियन अंतराळवीर मॅथियास मौररचे केस कापताना दिसले.

हेअरकट करून घेणारे अंतराळवीर मौरर यांनी ट्विटमध्ये लिहिले की, स्पेस सलूनमध्ये राजा चारी हा प्रतिभावंत माणूस आहे. आपल्यापैकी कोणालाच आपल्या डोळ्यावर केस नको आहेत किंवा त्याहून वाईट म्हणजे स्पेस स्टेशन सिस्टममध्ये केस डोकावत असतात.  व्हॅक्यूम क्लिनर आमच्या केसांच्या ट्रिमरला जोडलेले आहे. या स्पेस स्टायलिस्ट सेवेसाठी माझ्याकडून फाईव्ह स्टार्स.

मौररने अंतराळात केस कापण्याशी संबंधित धोक्यांबद्दल देखील सांगितले. ते म्हणाले की, 'जर आपल्या केसांचा एक छोटा कण किंवा तुकडा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या हार्डवेअरमध्ये गेला तर तो इलेक्ट्रिकपासून लाईफ सपोर्ट सिस्टमपर्यंत सर्वकाही खराब करू शकतो. यामुळे स्पेस स्टेशनवरील प्रत्येकासाठी धोका वाढेल. त्यामुळे अंतराळवीरांना अंतराळात केस कापण्याची परवानगी नाही.'

महिला अंतरळाविरांना केसांवर टोप्या  अनिवार्य

या त्रासांपासून दूर राहण्यासाठी, अंतराळवीरांना खूप लहान केस कापून पाठवले जाते. महिला अंतराळवीरांना केसांवर टोप्या घालाव्या लागतात. केसांच्या तुकड्यांपासून त्यांच्या आजूबाजूच्या यंत्रसामग्रीला कोणताही धोका नसतो तेव्हाच ते टोपी काढतात.

Web Title: Watch hair cutting in space nasa share video of astronauts get a fresh trim in zero gravity space haircuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.