Lokmat Sakhi >Social Viral > टॉवेल लावून मेट्रोत शिरला पठ्ठ्या; कॉन्फिडन्स पाहून प्रवासीही हैराण, पाहा व्हिडिओ

टॉवेल लावून मेट्रोत शिरला पठ्ठ्या; कॉन्फिडन्स पाहून प्रवासीही हैराण, पाहा व्हिडिओ

Man Walking in Metro Wearing Towel : फक्त टॉवेल लावून मेट्रोच्या आत शिरलेली आपण पाहू शकता हा  व्हिडिओ पाहून नेटिझन्समध्ये चांगलाच हशा पिकला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 11:28 AM2022-12-09T11:28:44+5:302022-12-09T15:41:11+5:30

Man Walking in Metro Wearing Towel : फक्त टॉवेल लावून मेट्रोच्या आत शिरलेली आपण पाहू शकता हा  व्हिडिओ पाहून नेटिझन्समध्ये चांगलाच हशा पिकला आहे

Watch video man walking in metro wearing towel went viral on social media funny video of man walks in metro wearing towel | टॉवेल लावून मेट्रोत शिरला पठ्ठ्या; कॉन्फिडन्स पाहून प्रवासीही हैराण, पाहा व्हिडिओ

टॉवेल लावून मेट्रोत शिरला पठ्ठ्या; कॉन्फिडन्स पाहून प्रवासीही हैराण, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात ते पाहून हसू आवरता येत नाही तर काही व्हिडिओ इमोशनल असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात एक व्यक्ती फक्त टॉवेल लावून मेट्रोच्या आत शिरलेली आपण पाहू शकता हा  व्हिडिओ पाहून नेटिझन्समध्ये चांगलाच हशा पिकला आहे. (Man Walking in Metro Wearing Towel) असं दृश्य तुम्ही या आधी कधीही पाहिलं नसेल. या माणसाला पाहून अनेकांना इज गार्डच्या जाहिरातीची आठवण झाली. त्या जाहिरातीत उष्णता आणि खाजेमुळे हैराण झालेले लोक फक्त टॉवेल लावून ट्रेनमध्ये प्रवास करताना  दिसले होते. (Watch video man walking in metro wearing towel went viral on social media funny video of man walks in metro wearing towel)

व्हिडिओमध्ये ती व्यक्ती ज्या पद्धतीने टॉवेल घालून अगदी आरामात मेट्रोमध्ये चालत आहे, ते पाहून तुम्ही गोंधळून जाल की तो काय करत आहे. हा व्हिडिओ 25 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि लोकांनी या मजेशीर व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेट्रोमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहिली असतील, पण हा माणूस रुमाल घालून का फिरतोय याच कारण लक्षात येत नाही.

भटजीबुवांची मंत्र म्हणण्याची स्टाईल पाहून पोट धरून हसाल; लग्नाचा व्हायरल व्हिडिओ

आरामात टॉवेल लावून तो आरशात बघून मेट्रोमध्ये आपले केस व्यवस्थित करत आहे. कधीकधी विचित्र गोष्टी करू लागतो. तो आत येताच लोक त्याच्याकडे गोंधळून बघत राहतात आणि काहीजण हसायलाही लागतात. गमतीची गोष्ट म्हणजे लोकांच्या अशा नजरेचाही त्या मुलावर परिणाम होत नाही आणि तो टॉवेल घालून आरामात उभा राहतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की तो असा मेट्रोत का शिरला असावा?
 

Web Title: Watch video man walking in metro wearing towel went viral on social media funny video of man walks in metro wearing towel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.