Join us  

हातात स्वर्गीय आईचा फोटो, वडिलांचा हात धरुन नवरी मंडपात आली; बापलेकीला पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:51 AM

Bride enter wedding hall with late mothers photo : नेटिझन्सना ही व्हायरल पोस्ट खूप आवडली आणि त्यांनी त्यांच्या आईची आठवण करून देत असलेल्या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला.

लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा, अविस्मरणीय दिवस असतो. वधू आणि वरांसाठी हा प्रसंग त्यांच्या प्रियजनांची आणि विशेषतः त्यांच्या पालकांच्या उपस्थितीनं खास बनतो. एका नववधूने तिच्या दिवंगत आईचा फोटो हातात घेऊन लग्नमंडपात प्रवेश केल्याचे व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडिया यूजर्सना भावूक करत आहे. (Bride enter wedding hall with late mothers photo) 

57 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, पाकिस्तानची रहिवासी असलेली वधू तिच्या वडिलांसोबत  लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करताना दिसत आहे. तिच्या दिवंगत आईची ब्लॅक अँड व्हाईट फोटो फ्रेम मायेने पकडून ती तिच्या वडिलांसोबत पुढे जात आहे. वधू तिला अश्रू येत असतानाही हसण्याचा प्रयत्न करते. तिचे वडीलही अश्रू पुसताना दिसतात. या व्हिडीओतून तिचं आपल्या देवाघरी गेलेल्या आईवरचं प्रेम दिसून येतंय. यावेळी तिचा चेहरा पाहून पाहणारेही हळवे होतात.

वधू लाल रंगाचा लेहेंगा घालून लग्नमंडपात प्रवेश करते तेव्हा  'माई तेरी चुनरिया लहराई.. हे गाणे  ऐकू येते. वधूचे नातेवाईकही तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. क्लिपचा शेवट विदाईच्या दृश्यांसह होतो. इस्लामाबादस्थित फोटोग्राफर महा वजाहत खान यांनी ही क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. "उन सब बेटों के नाम जिन की मां आज उनके साथ नही....जैसे मेरी...मिस यू सो मच अम्मी...," असं कॅप्शन त्यांनी व्हिडिओला कॅप्शन दिले.

केसांचा झाडू झालाय? शॅम्पू बदलूनही गळणं थांबत नाहीये? दाट, काळ्याभोर केसांसाठी 'हा' घ्या घरगुती हेअर मास्क

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला २.३३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटिझन्सना ही व्हायरल पोस्ट खूप आवडली आणि त्यांनी त्यांच्या आईची आठवण करून देत असलेल्या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला. अनेकांनी या व्हिडीओवर कौतुकास्पद तर काहींना भावूक कमेंट्स केल्या आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया