Join us  

फणा काढलेला नाग पोराला चावणार तोच.. पाहा जाबाज आईचा जिगरबाज व्हिडिओ, दारात आला कोब्रा आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 3:17 PM

Watch Viral Video How Woman Saves Her Son From a Giant Cobra : आईच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले मुलाचे प्राण

ठळक मुद्देपावसाळ्याच्या दिवसांत अशाप्रकारच्या घटनांपासून आपण स्वत:ला जपायला हवे.व्हिडिओमधील महिलेने अतिशय तत्परता दाखवून आपल्या मुलाचे प्राण कसे वाचवले ते दिसते.

कधी काय प्रसंग ओढावेल आणि आपला जीव धोक्यात येईल आपण काहीच सांगू शकत नाही. प्राण्यांमुळे होणारे अपघात तर अनेकदा आपल्या जीवावर बेतणारे असू शकतात. प्राणी केवळ जंगलातच असतात असा असा आपला समज असतो. पण कधी अचानक शहरात आलेला बिबट्या किंवा आणखी कोणता प्राणी आपल्यासाठी संहारक ठरु शकतो. इतकेच नाही तर मगर, नाग, साप यांमुळेही व्यक्तींचे जीव गेल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो. असाच जीवावर बेतणारा एक प्रसंग नुकताच समोर आला आहे. युट्यूबवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमधील महिलेने अतिशय तत्परता दाखवून आपल्या मुलाचे प्राण कसे वाचवले हे आपण पाहू शकतो (Watch Viral Video How Woman Saves Her Son From a Giant Cobra). 

(Image : Youtube)

एक आई आणि मुलगा आपल्या घराच्या इमारतीतून चालत बाहेर येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. त्यानंतर मुलगा जिन्यावरुन खाली उतरत असताना त्याठिकाणी पायरीच्या कडेनी एक नाग चाललेला असतो. पायरी उतरताना नेमका नागाच्या तोंडाजवळ मुलाचा पाय पडतो आणि तो नाग काही क्षणांत मागे होतो. काही कारणाने हा लहान मुलगा मागे फिरतो तेवढ्यात नाग आपला फणा बाहेर काढतो. आता तो मुलाला चावेल की काय असे वाटत असतानाच या मुलाची आई मागून येते आणि त्याला अतिशय तत्परतेने उचलून कडेवर घेते. आईच्या प्रसंगावधानतेमुळे मुलाचा जीव थोडक्यात वाचत असल्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते. 

द ट्रीब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना कर्नाटकातील मांड्या येथे घडली आहे. किंग कोब्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आईने मुलाला कडेवर घेतल्यामुळे त्याचे प्राण तर वाचलेच पण नंतर फणा उगारलेला कोब्राही शांतपणे आपल्या मार्गाने निघून गेल्याचे आपल्याला दिसेल. कदाचित मुलगा पाय देत असल्याचे वाटल्याने तो चिडला असेल आणि त्याने फणा उगारला असेल. पण हा कोब्रा जर चावला असता तर या लहानग्याच्या जीवावर बेतले असते हे नक्की. पावसाळ्याच्या दिवसांत अशाप्रकारच्या घटनांपासून आपण स्वत:ला जपायला हवे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालहान मुलं