Lokmat Sakhi >Social Viral > कामाच्या व्यापात स्वत:साठी ५ मिनिटं पण काढता येत नाहीत? ४ टिप्स- स्वत:साठी मिळेल वेळ...

कामाच्या व्यापात स्वत:साठी ५ मिनिटं पण काढता येत नाहीत? ४ टिप्स- स्वत:साठी मिळेल वेळ...

Ways to get me time between office & home responsibilities : 4 ways to take time for yourself even with a hectic schedule : कामाच्या गडबडीत स्वतःसाठी 'मी टाईम' मिळत नाही म्हणून तक्रार करण्यापेक्षा, करावेत असे सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 07:03 PM2024-10-11T19:03:28+5:302024-10-11T19:18:24+5:30

Ways to get me time between office & home responsibilities : 4 ways to take time for yourself even with a hectic schedule : कामाच्या गडबडीत स्वतःसाठी 'मी टाईम' मिळत नाही म्हणून तक्रार करण्यापेक्षा, करावेत असे सोपे उपाय...

Ways to get me time between office & home responsibilities 4 ways to take time for yourself even with a hectic schedule | कामाच्या व्यापात स्वत:साठी ५ मिनिटं पण काढता येत नाहीत? ४ टिप्स- स्वत:साठी मिळेल वेळ...

कामाच्या व्यापात स्वत:साठी ५ मिनिटं पण काढता येत नाहीत? ४ टिप्स- स्वत:साठी मिळेल वेळ...

सध्या रोजच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये बहुतांश महिलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. विशेषत: वर्किंग वुमन असणाऱ्या स्त्रियांना घर आणि ऑफिस असे दोन्ही सांभाळणे काहीवेळा खूप अवघड जाते. घर आणि ऑफीसमधील कामांचा मेळ साधताना बहुतेकींची तारेवरची कसरत होते. मुलांचा अभ्यास, स्वयंपाकाची लगबग, घरातील स्वच्छता, घरातील प्रत्येकाची काळजी, ऑफिसच्या जबाबदाऱ्या या सगळ्या कामाच्या व्यापात महिलांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही(Ways to get me time between office & home responsibilities).

एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम सांभाळताना आपली दमछाक होते. इतकेच नाही तर या सगळ्या कामात काहीवेळा आपण इतके बिझी असतो की स्वतःसाठी वेळही मिळत नाही. या रोजच्या कामाच्या गडबडीत स्वतःसाठीचा 'मी टाईम' मिळत नाही अशी अनेकींची कॉमन तक्रार असते. दिवसातला थोडासा वेळ हा स्वतःसाठी मिळावा तसेच या स्वतःच्या मी टाईममध्ये मनाला ज्यात आनंद वाटतो, असे काहीतरी करता यावे, अशी अपेक्षा जवळपास सर्वच महिलांची असते. पण या कामाच्या गडबडीत स्वतःसाठी स्वतःचा असा 'मी टाईम' मिळावा यासाठी काय करता येईल ते पाहूयात. दिवसभराचे काम आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःसाठी वेळ काढता यावा यासाठी या सोप्या टिप्स नक्की वापरून पहा(4 ways to take time for yourself even with a hectic schedule).

स्वतःसाठी थोडा 'मी टाईम' काढता यावा म्हणून... 

१. दिवसभराच्या कामाचे प्लॅनिंग करा :- दिवसभराच्या कामाचे अचूक प्लॅनिंग केल्यास आपल्याला स्वतःसाठी थोडा वेळ काढता येऊ शकतो. रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी आपल्याला काय काम करायची आहेत याची एक लिस्ट तयार करून मगच झोपा. दिवसभरात आपल्याला काय काय काम करायची आहेत, कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा आहे, एखाद्या कामात आपला किती वेळ जाणार आहे या सगळ्या गोष्टींचे अंदाज बांधून त्याप्रमाणे कामाचे प्लॅनिंग करा. जी कामे अगदी महत्वाची आहेत किंवा ज्या कामासाठी भरपूर वेळ जाणार आहे अशी कामे दिवसाच्या सुरुवातीलाच पूर्ण करून घ्यावीत. फार वेळखाऊ कामे सकाळच्या वेळीच पूर्ण झाली तर दिवसभरातील बाकीचा उरलेला वेळ आपल्याला इतर कामांसाठी आणि स्वतःसाठी मिळू शकतो. 

मुलांना पेन्सिल नीट धरता येत नाही ? बालरोगतज्ज्ञ सांगतात १ सोपी ट्रिक, अक्षर सुधारेल - पकड होईल मजबूत...

२. कामे वाटून द्यावीत :- सुपरवुमन असल्याप्रमाणे सगळी कामे मीच करणार असे न करता कामे वाटून द्यावीत. आपल्या घरातील इतर व्यक्तींसोबत कामे शेअर करावीत. कामाचा संपूर्ण भार स्वतःवर न घेता कामे वाटून द्यावीत, यामुळे तुमच्यावरील कामाचा भार हलका होण्यास मदत होईल. याचबरोबर कामे वाटून दिल्याने ती लगेच पूर्णही होतात आणि सगळ्या कामाचा ताण तुमच्यावरही येत नाही. यामुळे तुम्हाला स्वतःसाठी दिवसभरातील थोडा वेळ काढता येतो.

३. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका :- लोक काय म्हणतील या भीतीने अनेकवेळा स्त्रिया स्वतःसाठी काही करायला लाजतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करु नका. इतरांना आनंदी ठेवण्याप्रमाणेच स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रथम स्वतःला आनंदी ठेवणे महत्वाचे असते. जर तुम्ही स्वतः आनंदी नसाल  तर त्याचा तुमची मनःस्थिती, आरोग्य आणि कामावरही परिणाम होईल. त्यामुळे लोकांचा विचार न करता दिवसभरातील थोडा वेळ स्वतःसाठी काढायला विसरु नका. 

४. 'मी टाईम' मध्ये स्वतःसाठी वेळ द्या :-  'मी टाईम' मध्ये इतर काही गोष्टी न करता फक्त स्वतःसाठी किमान दिवसभरातील एक तास तरी द्यावा. 'मी टाईम'चा अर्थ हा प्रत्येकीसाठी वेगळा असू शकतो. 'मी टाईम'मध्ये तुम्ही फक्त अशाच गोष्टी कराव्यात ज्या तुम्हाला आनंदी करतात आणि ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला चांगले वाटते. कुणाला गाणी ऐकायला आवडतात, कुणाला चित्रकला आवडते, कुणाला डान्स करायला आवडतो. त्यामुळे 'मी टाईम' मध्ये स्वतःला आवडतील अशाच गोष्टी करण्याला प्राधान्य द्या.

कपल्स थेरपी म्हणजे काय? लग्नानंतर दोनच दिवसांनी फरहान अख्तरने घेतली या थेरपीची मदत कारण...

Web Title: Ways to get me time between office & home responsibilities 4 ways to take time for yourself even with a hectic schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.