Lokmat Sakhi >Social Viral > सतत इअरफोन्सचा वापर करता? तासाला कानात जमा होतील ७०० बॅक्टेरिया, ऐकण्याचीही क्षमता होईल कमी

सतत इअरफोन्सचा वापर करता? तासाला कानात जमा होतील ७०० बॅक्टेरिया, ऐकण्याचीही क्षमता होईल कमी

Wearing headphones for just an hour will increase the bacteria in your ear by 700 times इअरफोन्सचा वापर तासभरापेक्षा करू नका, अन्यथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2023 05:58 PM2023-07-22T17:58:19+5:302023-07-24T17:21:06+5:30

Wearing headphones for just an hour will increase the bacteria in your ear by 700 times इअरफोन्सचा वापर तासभरापेक्षा करू नका, अन्यथा..

Wearing headphones for just an hour will increase the bacteria in your ear by 700 times | सतत इअरफोन्सचा वापर करता? तासाला कानात जमा होतील ७०० बॅक्टेरिया, ऐकण्याचीही क्षमता होईल कमी

सतत इअरफोन्सचा वापर करता? तासाला कानात जमा होतील ७०० बॅक्टेरिया, ऐकण्याचीही क्षमता होईल कमी

आजकाल काहींना स्मार्टफोन आणि हेडफोनशिवाय जमत नाही. काही लोकं काम करत असताना, किंवा प्रवास करताना इअरफोन्स लावून आवडीची गाणी ऐकतात. किंवा मोबाईल फोनवर चित्रपट पाहण्यासाठी, यासह मोबाईल फोनद्वारे संवाद साधण्यासाठी हेडफोनचा वापर करतात. काही वेळेला लोकांना अंदाज नसतो, की आपण किती तास गाणी ऐकत आहोत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, जास्त वेळ इअरफोन्सचा वापर केल्याने, तासाभरात कानात ७०० पटीने बॅक्टेरियांची वाढ होते. ऐकून आश्चर्य वाटलं ना?(Wearing headphones for just an hour will increase the bacteria in your ear by 700 times).

यासंदर्भात, ईएनटी स्पेशालिस्ट डॉ.संदीप अरोरा सांगतात, ''कोरोना या वैश्विक महामारीनंतर लोकांमध्ये मोबाईल फोन आणि हेडफोन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यक्तींसह लहान मुलांना देखील या गॅजेट्सची सवय लागली आहे. काही वेळेसाठी आपण हे उपकरणे वापरू शकता. मात्र, त्याचा अधिक वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मुख्य म्हणजे, इअरफोनमधून येणारा आवाज कानाच्या पडद्याला जवळून आदळतो. ज्यामुळे कानाच्या पडद्याला कायमची इजा पोहचू शकते.''

इअरफोन्समुळे होणारे नुकसान

कानात वेदना

काही लोकांना मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची सवय असते. मात्र, अधिक वेळ इअरफोन वापरण्याची सवय कानासाठी घातक ठरू शकते. ज्यामुळे कानांच्या पडद्याला इजा पोहचू शकते.

१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास

मेंदूवर वाईट परिणाम

हेडफोन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स निर्माण करतात. याचा अधिक वेळ वापर केल्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे इअरफोन किंवा हेडफोन वापरताना, आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

कानात घाण जमा होणे

तासंतास हेडफोन वापरल्याने कानात घाण जमा होते. एक तास हेडफोन वापरल्याने कानात ७०० पटीने बॅक्टेरिया जमा होते. जे कान आणि मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे कानात इन्फेक्शन, ऐकण्यात अडचण अशी समस्या छळू शकते.

कानात इन्फेक्शन

काही लोकं आपले हेडफोन दुसऱ्या व्यक्तींसोबत शेअर करतात. अशा स्थितीत इअरफोन स्पंजद्वारे बॅक्टेरिया आणि जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, ज्यामुळे कानात संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यात दारं-खिडक्यांना गंज चढला? ४ सोप्या टिप्स - ५ मिनिटांत काढा गंज- स्वच्छता चकाचक

चक्कर येणे

हेडफोनचा वापर लिमिटेड करावा. कारण म्युसिकच्या मोठ्या आवाजामुळे कानाच्या कॅनलमध्ये दाब पडतो. ज्यामुळे अनेकदा चक्कर देखील येऊ शकते.

Web Title: Wearing headphones for just an hour will increase the bacteria in your ear by 700 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.