बदलत्या काळात लोकांचं राहणीमान आणि सण उत्सव साजरे करणाऱ्या पद्धती बऱ्याच बदलल्या आहेत. खासकरून लग्न समारंभात बराच बदल झालेला दिसत आहे. सुरूवातीच्या काळात अगदी साध्या, सोप्या पद्धतीनं लग्न व्हायची. आता मात्र लग्नपत्रिका राजेशाही थाटात तर वधूवराची एंट्री रॉयल पद्धतीनं होते. (Wedding invitation from 1933 viral) जवळपास ९० वर्षांपूर्वी लग्न पत्रिका कशी असेल याचा विचारही केला जाऊ शकत नाही. ८९ वर्ष जुनी लग्न पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Wedding invitation from 1933 viral old wedding invitation from 1933 surprises internet)
आता लग्नपत्रिकाही वेगवेगळ्या शैलीत छापल्या जात आहेत. आजच्या काळात लग्नपत्रिका वेगवेगळ्या रंगात अनेक डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत. त्याच वेळी, पूर्वीच्या काळात आजच्या तुलनेत लग्नपत्रिकेची रचना साधेपणाने आणि एका रंगात केली जात असे. अलीकडेच अशीच एक लग्नपत्रिका इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही लग्नपत्रिका पांढऱ्या कागदावर पूर्णपणे उर्दूमध्ये लिहिलेली आहे. असे सांगितले जात आहे की ज्या लग्नाचे कार्ड इंटरनेटवर व्हायरल होत आहे, हे लग्न 89 वर्षांपूर्वी 1933 मध्ये झाले होते.
या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @SonyaBattla2 या हँडलने शेअर करण्यात आला आहे. ही जुनी लग्नपत्रिका पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, '१९३३ मधली माझ्या आजी-आजोबांची लग्नाचे आमंत्रण पत्रिका.' कॉफी ब्राउन शेड कार्डमध्ये तुम्ही उर्दू कॅलिग्राफी स्पष्टपणे पाहू शकता. यामध्ये एक व्यक्ती 23 एप्रिल 1933 रोजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी पत्र लिहित आहे.
सतत चर्चेत असणारी गौतमी पाटील कोण? का तिचे नृत्य एवढे वादग्रस्त आहे?
ही लग्नपत्रिका व्हायरल होताना पाहून युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'उर्दू खूप सुंदर आहे.' दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, 'वधूचे नाव गायब आहे.' आणखी एका व्यक्तीने लिहिले, 'किती गोंडस लिहिले आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले, 'गली कासिम जान... गालिब येथे राहत होते. वेळेवर पोहोचणे खूप चांगले आहे.