सोशल मिडियामुळे आजकाल जगभरातल्या अनेक गोष्टी पाहायला- ऐकायला मिळतात. दिवसाकाठी कित्येक व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केले जातात. त्यातले काही खरोखरंच इंटरेस्टिंग असतात. त्यामुळेच तर त्याची देशभरात, जगभरात चर्चा होऊ लागते. सध्या लग्नसराई सुरू असल्याने लग्नाचे, नवरदेव- नवरीच्या (groom and bride) एन्ट्रीचे किंवा त्यांच्या फजितीचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर येत असतात. सध्या लग्नाचा असाच एक व्हिडिओ कमालीचा ट्रेण्डींग (trending video) आहे. अवघ्या ५ ते ६ सेकंदांचा हा व्हिडिओ. पण आतापर्यंत तो लाखो लोकांनी पाहिला असून जवळपास साडेचार लाख लोकांनी त्याला लाईक केलं आहे. (groom touches bride's feet)
ditigoradia या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर (instagram share) करण्यात आला आहे. आजपर्यंत आपण असं ऐकत आलो आहोत किंवा बघत आलो आहोत की लग्नात साधारणपणे एक तरी विधी असा असतोच, की त्यामध्ये नवरी नवरदेवाच्या पाया पडते. पाया पडणं हा आपल्याकडच्या संस्कृतीचा एक भाग आहे. ज्या व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असतात, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे आपण मोठ्या व्यक्तींच्या पाया पडतो. काही अपवाद सोडले तर आपल्याकडे नवऱ्याचं वय बायकोपेक्षा जास्त असतं. त्यामुळे त्या ज्येष्ठतेनुसार बायको नवऱ्याच्या पाया पडते. पण इथे एका लग्नात मात्र उलटंच झालं..
Click For Video
https://www.instagram.com/reel/Ce6Q6unlTg9/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की नुकतंच लग्न होऊन नवरा- बायको दोघंही स्टेजवर आपापल्या खुर्चीवर बसले आहेत. त्यानंतर नवरदेव अचानक उठतो आणि शेजारी बसलेल्या त्याच्या नवरीच्या पाया पडतो. ही कृती तो एवढ्या झटपट करतो, की ते पाहून ती नवरीही क्षणभर गोंधळून जाते. पाया पडल्यानंतर तो प्रेमाने तिला जवळही घेतो. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद, प्रेम आणि आदर असे सगळेच भाव एकदम चमकून जातात. आता नवरदेवाने केलेलं हे कृत्य त्यांच्या पंडितजींना अजिबात आवडलेलं नव्हतं, पण नंतर ते नवरीला 'नशिबवान मुलगी आहेस', असं म्हणाले होते. असंही या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केली आहे की तो तुमच्या दोघांमधला प्रश्न असून एकप्रकारे त्या नवरदेवाने आपल्या बायकोचा केलेला हा सन्मान आहे. आता काही जणांना नवऱ्याचं हे कृत्य संस्कृतीविरोधी वाटलं असून त्यांनी नवऱ्यावर जाहिरपणे टिकाही केली आहे. एक सहजसुंदर कृती म्हणून हा व्हिडिओ बघायला निश्चितच छान आहे. नवरा वरचढ आणि बायको दुय्यम असं अजूनही आपल्याकडे समजलं जातं. आता झालेल्या बायकोला नमस्कार करून तो जर तिला बरोबरीचं स्थान देत असेल तर शेवटी हा त्या दोघांमधल्या अंडरस्टँडिंगचा प्रश्न आहे.