'हम आपके है कौन' (Hum aapke hai kaun) हा चित्रपट सर्वार्थाने एक हिट चित्रपट होता.. अजूनही तो चित्रपट तेवढ्याच कौतूकाने पाहिला जातो. या चित्रपटात दाखवण्यात आलेला नवरदेवाचे बूट चोरण्याचा प्रसंग आणि त्यानंतर नवरीच्या बहिणींनी त्याच्याकडून केलेली पैशांची वसूली हा तर एक ट्रेण्ड होऊन बसला आहे.. तोपर्यंत असाही काही रस्म- रिवाज (jute churai ritual) असतो, हे कुणाला माहितीही नव्हते. पण त्यानंतर मात्र जवळपास प्रत्येक लग्नातला तो एक सगळ्यात मुख्य इव्हेंट झाला आहे. सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या एका व्हिडिओमध्येही (viral video) तिच कथा..
callmepoooooandagarwal26siddharth या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका लग्नसमारंभात सुरु असणाऱ्या जुते चुराई आणि त्यानंतरची वसूली या प्रसंगांचा हा व्हिडिओ आहे. नवरदेवाचे बूट जेव्हा नवरीकडच्या मंडळींच्या हातात येतात, तेव्हा नवरीच्या करवल्या आणि भावंडांना नवरदेवाकडून काय पाहिजे ते वसूल करण्यासाठी जणू ही एक मोठी संधी मिळालेली असते. त्यामुळे मग नवरीचे बहिणभाऊ एकदम मोठी रक्कम मागतात. नवऱ्याकडच्या मंडळींना मात्र एवढी मोठी रक्कम देणं साहजिकच जिवावर येतं.. त्यामुळे दोन्ही पार्ट्यांकडून याविषयी जोरदार नोकझोक सुरू होते. फायनल आकडा काही ठरतच नाही.. म्हणूनच तर व्हिडिओमधल्या या हुशार नवरा- नवरीने या समस्येवर एक मस्त तोडगा शोधून काढला आहे.
यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की नवरदेवाचे बूट नवरीकडच्या मंडळींच्या हातात आहेत आणि पैसे वसूलीसाठी त्यांचा मोठ्या उत्साहात पाठपुरावा सुरू आहे. तर नवरीच्या हातात आहे एक spinning wheel. हे व्हील मोठं खास आहे. कारण या व्हिलवर पैशांचे वेगवेगळे आकडे लिहिलेले आहेत. ते व्हिल नवरीने हातात पकडलं, नवरदेवाने ते फिरवलं.
कंबरेएवढ्या पाण्यातून गरोदर बाईला नेले दवाखान्यात, व्हिडिओ व्हायरल- काय ही भयानक अवस्था
त्यानंतर ते एका रकमेवर येऊन ते थांबलं आणि ज्या रकमेवर ते आलं तेवढे पैसे नवरदेवाने नवरीच्या करवल्या आणि भावंडांना द्यायचे, असं त्यांचे डील झालं. त्यामुळे मग किती पैसे मागायचे आणि किती द्यायचे? हा वादच मिटला. या व्हिडिओवरून असं दिसत आहे की ते व्हिल खूपच कमी किमतीला येऊन थांबलं. ती किंमत पाहून नवरदेव तर खूश झाला पण नवरीकडच्या मंडळींचा मात्र हिरमोड झाला. त्यामुळे मग एका जणाने पुन्हा ते हाताने फिरवण्याचा प्रयत्न केला. पण नवरदेवाने मात्र स्पष्ट नकार देत त्यांचा तो डाव मोडीत काढला.