सध्या सुरू असलेल्या लग्नकार्यात लोक आपलं लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी काही कसर सोडत नाहीत. भारतीय विवाहसोहळे त्यांच्या विस्तृत सेटअपसाठी, तीन दिवसांच्या कार्यक्रमासाठी, वधू-वरांच्या भव्य प्रवेशासाठी ओळखले जातात. लग्नसोहळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते ती नवरा नवरीची एंट्री. पाहुणे मंडळी नवरा नवरीचा लूक आणि हटके स्टाईल बघण्यासाठी खूप उत्सुक असतात. अनेक ठिकाणी नवरीमुलगी पालखीतून येताना दिसते तर कुठे डोलीतून. (Wedding turns nightmare bride and groom fall from swing watch viral video)
विवाहसोहळा आता कुटुंबांऐवजी इव्हेंट प्लॅनर्सद्वारे आयोजित केला जात आहे कारण प्रत्येक लग्न एखाद्या चित्रपटाच्या सेटसारखे दिसते. रथ, फिरणारे प्लॅटफॉर्म आणि नेत्रदीपक प्रवेशद्वार बनवून जोडप्याचा त्यांच्या पाहुण्यांशी परिचय करून देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना दिसतात.
सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विवाहित जोडपे ओव्हल-आकाराच्या झोपाळ्यामध्ये फटाक्यांच्या आतशबाजीसह खाली येताना दाखवले आहे. अचानक झोपाळा तुटतो तेव्हा जोडपे स्विंगवरून खाली पडते.
नवरा नवरी पडताच पाहुणे आणि कुटुंबातील सदस्य या जोडप्याला वाचवण्यासाठी स्टेजच्या दिशेने धावत येतात आणि आरडाओरडा करताना दिसतात. समोर आलेल्या माहितीनुसार हे जोडपे 12 फूट उंचीवरून पडले आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर, जोडपे 30 मिनिटांनंतर त्यांच्या लग्नाच्या विधीसाठी पुढे गेले.
काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये फ्रिलचा पांढरा गाऊन घातलेली मुलगी नवरदेवाशेजारी बसली होती. बहुतेकजण हे जोडपे मंचावर येण्याची कल्पना करत असताना, ही जोडी लाल रंगाच्या सॅटिन कापडाने सजलेल्या जड मशीनरीवरून खाली येताना दिसली. पण या जोडप्याला ही रॉयल एंट्री चांगली अंगाशी आली.