Lokmat Sakhi >Social Viral > लग्नात मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरा-नवरीनं डोक्यावरच हात मारला; व्हिडिओ पाहून जोरजोरात हसाल

लग्नात मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरा-नवरीनं डोक्यावरच हात मारला; व्हिडिओ पाहून जोरजोरात हसाल

Wedding Video : हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवरानवरीला काय भेट द्यावं याचे काही संकेत असतात मात्र मस्करी करण्याच्या नादात कधीकधी मित्रही जरा अती करतात. तसंच काहीसं सांगणारा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:39 AM2022-07-21T11:39:09+5:302022-07-21T12:27:16+5:30

Wedding Video : हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवरानवरीला काय भेट द्यावं याचे काही संकेत असतात मात्र मस्करी करण्याच्या नादात कधीकधी मित्रही जरा अती करतात. तसंच काहीसं सांगणारा हा व्हिडिओ

Wedding Video : Bride groom feel shy after seeing gift given by friend then what happened next see funny wedding video | लग्नात मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरा-नवरीनं डोक्यावरच हात मारला; व्हिडिओ पाहून जोरजोरात हसाल

लग्नात मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरा-नवरीनं डोक्यावरच हात मारला; व्हिडिओ पाहून जोरजोरात हसाल

लग्नाचा सिझन येताच सोशल मीडियावर लग्नाच्या मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडिओंचा पूर येतो. असे काही व्हिडिओ आहेत जे आपल्याला आश्चर्यचकित करतात आणि काही असे आहेत की ते पाहिल्यानंतर लोक आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. हा व्हिडीओ एका लग्नाचा आहे, ज्यामध्ये वधू-वरांना लग्नाची अशी भेट मिळाली की, दोघंही ती भेट पाहून खूप लाजले आणि मग हसायला लागले. नवरानवरीला काय भेट द्यावं याचे काही संकेत असतात मात्र मस्करी करण्याच्या नादात कधीकधी मित्रही जरा अती करतात. तसंच काहीसं सांगणारा हा व्हिडिओ (Bride groom feel shy after seeing gift given by friend then what happened next see funny wedding video)

 वधू आणि वर स्टेजवर बसले आहेत आणि वराच्या हातात एक भेटवस्तू देखील दिसत आहे. वर ही भेटवस्तू उघडत आहे आणि वधू देखील या भेटवस्तूकडे लक्षपूर्वक पाहत आहे. पण वराने भेटवस्तू उघडताच वधूही जोरात हसायला लागली. मग वर ती भेट लपवण्याचा प्रयत्न करतो.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील वधू-वरांचे मजेदार भाव लोकांना खूप आवडले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर logesh2385 नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि लोक व्हिडिओवर खूप मजेदार कमेंट्स देखील करत आहेत.

Web Title: Wedding Video : Bride groom feel shy after seeing gift given by friend then what happened next see funny wedding video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.