Join us  

Wedding Video : होणाऱ्या नवऱ्याला स्टेजवर पाहताच नवरीला अश्रू अनावर; शेवटी जे घडलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 12:14 PM

Wedding Video : सोशल मीडियावर एका जोडप्याचा लग्नाच्या हॉलमधील भावनीक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लग्नाच्या दिवशी वधू आणि तिचे संपूर्ण कुटुंब खूप भावूक होते. नववधू एक नवीन जीवनाची सुरूवात  करण्यासाठी तिच्या घरातून बाहेर पडते आणि आशा करते की तिचा जोडीदार तिला पुढील आयुष्यात आनंदी ठेवेल. जोडीदारासोबतचे बाँडिंग जितके मजबूत असेल तितके नाते अधिक घट्ट होते असे म्हटले जाते.  सोशल मीडियावर एका जोडप्याचा लग्नाच्या हॉलमधील भावनीक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Bride groom video wedding video indian marriage crying dulha dulhan trending)

कधी कधी नववधू आपल्या भावी जोडीदाराचा चेहरा पाहून भावूक होतात आणि सर्वांसमोर अश्रू दाटून येतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पाहायला मिळाला. वर स्टेजवर आतुरतेने वाट पाहत आहे आणि वधूलाही लवकरच तिच्या जोडीदारासमोर हजर व्हायचे आहे. नवरीने स्टेजवर जाण्सायाठी ब्राइडल एन्ट्री घेताच तिला समोर तिचा वर दिसला. वराचा चेहरा पाहताच ती खूप भावूक झाली.

नादच खुळा! ७६ वर्षांच्या मराठमोळ्या आजींनी केला जबरदस्त डान्स; उर्मिला आणि रेमो म्हणाले....

वधू हळू हळू आपली पावले पुढे टाकत होती आणि वरही तिच्याकडे एकटक नजरेने पाहत होती. आपल्या वराला पाहून वधू भावूक झाली आणि ती रडू लागली. त्यानंतर तिला पाहून वरही भावूक झाली. तिला पाहून वधूजवळ उपस्थित असलेले लोकही भावूक झाले. व्हिडिओच्या शेवटी एक हृदयस्पर्शी दृश्य दिसले.

वधू हात जोडून चेहऱ्यावर हसू घेऊन बसली आहे आणि वराने तिला मंगळसूत्र घातले आहे. साउथ इंडियन लग्नाचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडतोय. आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे तर सुंदर क्षण टिपल्याच्या कमेंट्स सोशल मीडिया युजर्सनी केल्या आहेत.  

टॅग्स :लग्नसोशल व्हायरलसोशल मीडिया