Lokmat Sakhi >Social Viral > Weight Loss  : काय सांगता? फेसबुक, इंस्टाग्राम डिलीट करून तिनं ३० किलो वजन घटवलं; पण कसं? जाणून घ्या

Weight Loss  : काय सांगता? फेसबुक, इंस्टाग्राम डिलीट करून तिनं ३० किलो वजन घटवलं; पण कसं? जाणून घ्या

Weight Loss Social Viral  : तिनं स्वत: आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 01:44 PM2021-10-28T13:44:11+5:302021-10-28T14:01:34+5:30

Weight Loss Social Viral  : तिनं स्वत: आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

Weight Loss  : Deleting facebook instagram and twitter woman reduced 30 kg weight without dieting | Weight Loss  : काय सांगता? फेसबुक, इंस्टाग्राम डिलीट करून तिनं ३० किलो वजन घटवलं; पण कसं? जाणून घ्या

Weight Loss  : काय सांगता? फेसबुक, इंस्टाग्राम डिलीट करून तिनं ३० किलो वजन घटवलं; पण कसं? जाणून घ्या

फिट आणि स्लिम दिसणं कोणाला नाही आवडत! त्यासाठी लोक घरगुती उपायांपासून जीमला जाण्यापर्यंत वेगवेगळे उपाय करत असतात. पण सोशल मीडिया वापरणं टाळून लोक बारिक होतात असं तुम्ही कधीच ऐकलंय का? वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण एका मुलीनं फेसबुक- इंस्टाग्राम डिलीट करून तब्बल ३० किलो वजन कमी केलं आहे. (Weight Loss Journey)

लंडनची (North London) रहिवासी असलेली  ३३ वर्षीय ब्रेंडा फिननं (Brenda Finn) दावा केलाय की तिनं सोशल मीडियापासून दूर राहून वजन कमी केलं आहे. ब्रेंडानं एका वर्षात ३० किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं आहे. तिनं स्वत: आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.  (How to loss Weight ) 

 समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्याबद्दल 'या' १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

'डेली स्टार' नं दिलेल्या माहितीनुसार फिनला सतत काहीना काही खात राहण्याची सवय होती.  २०१६ ते २०१९ मध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तिनं आपलं वजन जास्त वाढवून घेतलं होतं. एकवेळ अशी होती जेव्हा ब्रेंड फिनचं वजन  ४८ किलोपर्यंत पोहोचलं होतं. अशा स्थितीत तिला अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागलं  होतं. 

याला सोशल मीडियावर जबाबदार असल्याचं तिचं म्हणणं होतं. ऑनलाईन असताना तिला चांगल्या तब्येतीसाठी खूप टिप्स दिसायच्या त्यासाठी त्यामुळे ती डिप्रेस व्हायची. या सगळ्याला कंटाळून तिनं आफलं सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले.   तिनं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करून सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. आपली वेटलॉस स्टोरी सांगताना तिनं याबबत खुलासा केला आहे.

कमाल! एखाद्या बाईलाही लाजवेल इतकी सुंदर साडी नेसतोय हा तरूण; पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडिया वापरणं बंद केल्यानंतर अचानक तिचं वजन कमी होऊ लागलं. त्यानंतर  तिनं ३ किलोंपेक्षा जास्त वजन कमी केल्याचं सांगितलं. ब्रेंडाच्यामते सोशल मीडियापासून लांब राहिल्याशिवाय हे सगळं शक्य नव्हतं.  फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्रासाठी वाया जाणारा वेळ तिनं जॉगिंग, जिमसाठी वापरला. याशिवाय कुकिंग शिकत स्वत:साठी हेल्दी पदार्थ बनवणं सुरू केलं. यामुळे वजन कमी करणं शक्य झालं. 

Web Title: Weight Loss  : Deleting facebook instagram and twitter woman reduced 30 kg weight without dieting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.