लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. कॅन्सर आणि हार्ट अटॅकसारख्या गंभीर जीवघेण्या आजाराचं हे कारण ठरू शकते. एकदा वजन वाढलं की कमी होत होत नाही. वजन कमी करण्यासाठी डाएट जीम असे वेगवेगळे घरगुती उपाय केल्यानंतरही फारसा परीणाम दिसून येत नाही. (159 kg know his diet plan workout weight loss secrets)
वजन कमी करणं एका दिवसात शक्य होत नाही हळूहळू परीणाम दिसतात. या प्रवासात बरेच लोक मागे हटतात पण काहीजण जिद्दीनं आपल्या उद्दीष्टापर्यंत पोहोचतात. एका ३८ वर्षीय मायकल मेहलर (Michael Mehler) नावाच्या व्यक्तीनं जवळपास १५९ किलो वजन कमी केलं आहे. (Weight loss journey german man michael mehler loss)
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार वजन कमी करण्याआधी मेहलर घाम न गाळता ३ फूटसुद्धा चालू शकत नव्हता. १० एक्स एल साईजचा शर्ट आणि ७४ इंच साईजची पँन्ट त्यांना घालावी लागत होती. मेहलर आता एक हेल्दी लाईफस्टाईल जगत आहे. बेरियाट्रिक स्लीव सर्जरीनं त्यानं २३ किलो वजन कमी केलं.
२०२० मध्ये मेहलरचं वजन २६३ किलो होतं. यावेळी त्यांनी बेरियाट्रिक स्लिव्ह सर्जरी केली आणि जवळपास २३ किलो वजन कमी केलं. बेरियाट्रिक स्लिव्ह सर्जरीमध्ये पोटाचा आतला भाग कापला जातो. वास्तविक ही सर्जरी पीडित व्यक्तीच्या जेवणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केली जाते.
सर्जरीनंतर मेहलरनं व्यायाम करायला सुरूवात केली. त्यांनी आपलं वर्कआऊट रुटीन तयार केलं. ज्यात आठवड्याभरात सहावेळा २ तास वेट ट्रेनिंग आणि दोन तास कार्डिओ ट्रेनिंगचा समावेश होता. त्यांनी सांगितलं की आहारात बदल केल्यानं आणि रोज व्यायाम केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्याच्या प्रवासात त्यांनी हेल्दी आहार घेण्यास सुरूवात केली. नुटेला, जर्मन कोल्ड कट्स आणि ब्रेड रोल्स सारखे अनहेल्दी पदार्थ खाणं बंद केलं आणि हेल्दी आहार घेण्यास सुरूवात केली. सकाळच्या नाश्त्याला डाळी आणि बेरीज, दुपारच्या जेवणाला भात, चिकन आणि भाज्या, डिनरसाठी टूना, सॅल्मनसारखे मासे, भाजी, चपाती या पदार्थांचा समावेश होता.
३८ वर्षीय मेहलरनं आपलं वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायला सुरूवात केली. व्यायाम हा जीवनाचा एक भाग असायला हवा असं त्याचं म्हणणं आहे. सुरूवातीला हेवी व्यायाम न करता तुम्ही सिंपल, प्लेन व्यायामानं सुरूवात करू शकता.